नाशिकमधील पंचवटी येथे लक्ष्मणाने कापले होते शूर्पणखाचे नाक

नाशिकमधील पंचवटी येथे लक्ष्मणाने कापले होते शूर्पणखाचे नाक

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला काही तास शिल्लक राहिले आहेत. 22 जानेवारीला भव्य दिव्य असा उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या दिवसाची सर्वच भारतीय मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातील लाखो हिंदू अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. अयोध्येव्यतिरिक्त 22 जानेवारीला अनेकजण पंचवटी येथील काळाराम मंदिराला देखील भेट देणार आहेत.

नाशिकला महाराष्ट्राची काशी म्हटलं जातं. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहरचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. नाशिकमधील अनेक तीर्थक्षेत्रांपैकी प्रसिद्ध असलेली पंचवटीचा आज आम्ही तुम्हाला इतिहास सांगणार आहोत. नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे. काळाराम मंदीराजवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो. वनावास काळात श्रीराम सव्वा दोन वर्षे पंचवटीत वास्तव्यास होते.

काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर अशी अनेक मंदिरे पंचवटी आणि सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. या मंदिरांमुळेच नाशिकला ‘’महाराष्ट्राची काशी ‘’असे म्हटले जाते. पंचवटीच्या बाजूला पर्णकुटी आहे. या प्राचित गुफेला सितागुफा म्हणून ओळखले जाते. हि गुफा प्रतिकात्मक स्वरुपाची आहे. गुफेत प्रवेश केल्यावर श्रीराम लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. तसेच येथे शंकराची पिंड देखील आहे.

याचं ठिकाणी लक्ष्मणाने कापले शूर्पणखाचे नाक

रामायणाशी निगडीत आणिखी एक अख्यायिका सांगितली जाते. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) लक्ष्मणाने या ठिकाणी कापले. आणि यावरूनच नासिक अथवा नाशिक हे नाव शहराला पडले असे म्हटले जाते.


हेही वाचा :

कयीने श्रीरामांसाठी 14 वर्षांचाच वनवास का मागितला? ‘हे’ होते रहस्य

First Published on: January 21, 2024 4:45 PM
Exit mobile version