देशात ‘या’ गुहेमध्ये आहेत पुरातन मंदिर

देशात ‘या’ गुहेमध्ये आहेत पुरातन मंदिर

भारत समृद्ध सांस्कृतिक वारसासाठी जगभर प्रसिद्ध आहे. म्हणून जगभरातून भारतात लोक भेट देण्यासाठी येतात आणि येथील सांस्कृतिक वारसा अनुभवतात. भारताचा इतिहास प्राचीन स्मारके आणि अद्भुत मंदिराद्वारे चित्रित करण्यात आला आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये असलेली अनेक मंदिरे आध्यत्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्वाची आहेत. वास्तविक, येथे अनेक गुहा आणि मंदिरे आहेत, ज्यांना रॉक-कट मंदिर देखील म्हणतात. जाणून घेऊयात, अशाच काही गुहा आणि मंदिराबद्द्दल

अंजिठा लेणी –
महाराष्ट्राच्या औरंगाबादच्या जिह्यात अंजिठा लेणी स्थित आहेत. येथे सुमारे ३० दगडी लेणी असून या स्थळांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. ही दगडी गुहा सुमारे २००० वर्षांपूर्वी बांधली आहे असे म्हटले जाते. या लेण्यांमध्ये सर्व मंदिरे भगवान बुद्ध आणि त्यांच्या मठांना समर्पित आहेत. यामुळेच बौद्ध धर्माच्या अनुयायांमध्ये या लेण्यांचे धार्मिक महत्व आहे. ही लेणी बौद्ध स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानण्यात येते.

एलोरा लेणी –
एलोरा लेणी या औरंगाबाद येथे आहेत. हे खडकांपासून बनवलेले सर्वात मोठे मठ- मंदिर संकुल आहे. एलोरा लेणी बौद्ध, हिंदू आणि जैन मंदिरे असलेल्या ३४ लेण्यांचे एक संकुल आहे. ही गुहा-मंदिरे चौथ्या आणि पाचव्या शतकात बांधली आहेत. या लेण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील कैलास मंदिर. येथे दक्षिणेला १२ बौद्ध लेणी, मध्यभागी १७ हिंदू लेणी आणि उत्तरेला ५ जैन लेणी आहेत.

एलिफंटा –
एलिफंटा लेणी मुंबईजवळ स्थित भारतातील रॉक-कट गुहा मंदिरांपैकी एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मुंबई शहरापासून १०० किमी अंतरावर एलिफंटा बेटावर आहे. बेटावर लेण्यांचे २ गट असून पहिल्यामध्ये ५ हिंदू लेणी तर दुसऱ्यामध्ये २ बौद्ध लेणी आहेत. हिंदू लेण्यांमध्ये भगवान शिवाला समर्पित एक मंदिर असून येथे असलेली शिल्पे ५ व्या आणि ८ व्या शतकातील आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात एलिफंटा बेटावर नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

बदामी लेणी –
बदामी लेण्या या कर्नाटकात आहेत. येथील मंदिरे बदामी चालुक्य वास्तुकला प्रतिबिंबित करतात, जी ६व्या शतकात सुरु झाली. या संकुलात शिव, भगवान, विष्णू आणि जैन संताना समर्पित असलेल्या एकूण पाच गुहा आहेत. विशेष म्हणजे गुहेचा आकार लहान असल्याने त्यात प्रवेश करण्यासाठी खाली रेंगाळत जावे लागते.

 


हेही वाचा ; भारतातील ‘या’ ठिकाणी रोज सूर्योदयानंतर येतात श्री राम!

 

First Published on: January 16, 2024 2:41 PM
Exit mobile version