Vastu Tips : फिश एक्वेरियम कोणत्या दिशेला असावे?

Vastu Tips : फिश एक्वेरियम कोणत्या दिशेला असावे?

वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये आणि व्यापाराच्या ठिकाणी फिश एक्वेरियम ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की, भगवान विष्णूंचा पहिला अवतार हा मस्य अवतार होता. त्यामुळे अगदी पौराणिक ग्रंथांमध्येसुद्धा माशांना देव स्वरुप मानले आहे. त्यामुळे आपल्या घरातसुद्धा फिश एक्वेरियम ठेवणे खूप शुभ मानले जाते.  इतकंच नव्हे तर, फिश एक्वेरियममधील मासे तुमच्या घरात आणि व्यापारात सकारात्मकता वाढवण्यासाठी तसेच कामांमधील अडथळे दूर करण्यासाठी मदत करतात. रंगबेरंगी माशांचा फिश एक्वेरियम आपल्या घराची शोभा वाढवतो, शिवाय घरातील नकारात्मकतासुद्धा दूर करतो. परंतु फिश एक्वेरियम ठेवण्याची योग्य पद्धत आणि योग्य दिशा तुम्हाला माहीत असायला हवी.

फिश एक्वेरियम कोणत्या दिशेला ठेवावे?

घरातील किंवा ऑफिसमधील फिश एक्वेरियम नेहमी ईशान्य दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. कारण, ईशान्य दिशेला जल तत्व आहे. फिश एक्वेरियम पाण्याशी संबंधीत असल्याने हे या दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. ईशान्य दिशेला शक्य नसल्यास तुम्ही उत्तर, पूर्व दिशेला देखील फिश एक्वेरियम ठेऊ शकता. या दिशा देखील फिश एक्वेरियम उत्तम मानली जाते.

फिश एक्वेरियमसाठी वास्तू टिप्स


हेही वाचा :

लग्न लवकर ठरत नाही? मग दररोज करा देवी पार्वतीच्या ‘या’ प्रभावी स्तोत्राचे पठण

First Published on: January 16, 2024 5:06 PM
Exit mobile version