Vastu Tips : रविवारी का करू नये तुळशीची पूजा? जाणून घ्या कारण

Vastu Tips : रविवारी का करू नये तुळशीची पूजा? जाणून घ्या कारण

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपट्याचे खूप महत्व आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असं म्हणतात की, नियमीत तुळशीच्या रोपट्याची पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धीचा वास होतो. तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीसोबतच नारायणांचा देखील आर्शिवाद प्राप्त होतो. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? शास्त्रात रविवारी तुळशीची पूजा करण्यास नकार देण्यात आला आहे.

रविवारी का करु नये तुळशीची पूजा?

 

असं म्हटलं जात की, रविवारी तुळस श्री विष्णूचा उपवास करते. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घातल्याने किंवा तिची पूजा केल्याने तिच्या उपवासामध्ये व्यत्यय निर्माण होतो. ज्याचा अशुभ प्रभाव आपल्याला भोगावा लागू शकतो.

फक्त रविवारच नाही तर एकादशीच्या दिवशी देखील तुळशीला पाणी घालू नये. पौराणिक कथेनुसार, एकादशीच्या दिवशी देवी तुळशीचा विवाह विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामशी झाला होता. हा विवाह देवउठनी एकादशीला झाला होता. तुळस हे देवी लक्ष्मीचेच रुप आहे. एकादशीला देवी लक्ष्मींचा उपवास असतो. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घातल्याने तिचा उपवास तुटतो यामुळए रोप हळूहळू सुकायला लागते.

असं म्हणतात, ज्या घरातील तुळस नेहमी हिरवीगार असते. तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो.  घरात तुळस असणं खूप शुभ मानले जाते,  तुळशीला नियमितपणे जल अर्पण केले जाते, परंतु धार्मिक ग्रंथ रविवारी आणि एकादशीला जल अर्पण करण्यास मनाई करतात.

 


हेही वाचा :

Vastu Tips : तुळशी शेजारी कधीही ठेऊ नका ‘या’ गोष्टी

First Published on: April 22, 2023 5:37 PM
Exit mobile version