कैकयीने श्रीरामांसाठी 14 वर्षांचाच वनवास का मागितला? ‘हे’ होते रहस्य

कैकयीने श्रीरामांसाठी 14 वर्षांचाच वनवास का मागितला? ‘हे’ होते रहस्य

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला काही तास शिल्लक राहिले आहेत. 22 जानेवारीला भव्य दिव्य असा उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या दिवसाची सर्वच भारतीय मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातील लाखो हिंदू अयोध्येत उपस्थित राहणार आहेत.

धार्मिक मान्यतेनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्रीविष्णूंनी, प्रभू रामचंद्रांच्या रुपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. रामनवमीनिमित्त प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातील अनेक रहस्य, कथा आवर्जुन सांगितल्या जातात. असीच एक कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे श्री राम यांनी 14 वर्षांचा वनवास भोगला होता. परंतु हा वनवास 14 वर्षांचाच का होता? 10, 12 किंवा 13 वर्षांचा का नाही? या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कैकयीने का मागितला रामासाठी 14 वर्षांचा वनवास?

वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणानुसार, राजा दशरथ यांनी राणी कैकयीच्या हट्टामुळे श्री राम यांना 14 वर्षांचा वनवास करण्यास सांगितले होते. कैकयीने तिची दासी मंथराचे म्हणण्यानुसार राजा दशरथाकडून आपला मुलगा भरतसाठी सिंहासन मागितले आणि रामाला 14 वर्षे वनवासासाठी पाठवण्याचे वचन मागितले होते. हे वचन देताना दशरथ अत्यंत दुःखी अवस्थेत होते, परंतु वचन देऊनही ते काहीही करू शकले नाही. मात्र, रामही याला विरोध करू शकत होते, पण त्यांनी तसे केले नाही.

म्हणून श्री रामांना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला

कैकयीने रामाला 10,12 किंवा 13 ऐवजी 14 वर्ष वनवासात पाठवण्यामागे देखील अनेक कारणं होती. कैकयीला राज्यातील प्रशासकीय नियम चांगलेच माहित होते. त्रेतायुगातील नियमानुसार, जेव्हा एखादा राजा 14 वर्ष राज्यापासून दूर गेला तर तो त्याचा राजाच्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार गमावतो. याचं कारणामुळे कैकयीने रामासाठी 14 वर्षांचा वनवास मागितला होता. दरम्यान, कैकयीचा मुलगा भरत याने कैकयीची ही युक्ती यशस्वी होऊ दिली नाही. त्याने राम वनवासाला गेल्यानंतर रामाच्या सिंहासनावर बसण्यास नकार दिला. वनवास संपवून राम परत आले तेव्हा भरताने त्यांना सन्मानपूर्वक सिंहासन परत केले.

 


हेही वाचा :

भारतातील ‘या’ ठिकाणी रोज सूर्योदयानंतर येतात श्री राम!

First Published on: January 21, 2024 2:34 PM
Exit mobile version