गुढीवर कलश उलटा का ठेवला जातो?

गुढीवर कलश उलटा का ठेवला जातो?

गुढीपाडवा या सणापासून हिंदू नव वर्षाला सुरुवात होते. हिंदू पंचागानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी उभारताना आपण नेहमी कलश गुढीवर उलटा ठेवतो. पण यामागे नक्की काय कारण आहे? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गुढीवर कलश उलटा का ठेवतात?

हिंदू धर्मानुसार, गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने त्यातून निघणाऱ्या लहरींचा फायदा जमिनी जवळच्या वायूमंडलाला, उर्ध्वमंडलाला मिळण्यास मदत होते. यावेळी कलशामध्ये लावलेले कडुलिंब, कलश, साखरमाळ आणि वस्त्र यांमुळे वायूमंडल शुद्ध होते. गुढी आपण घराच्या मुख्य दाराबाहेर किंवा घराच्या खिडकी, गॅलरीमध्ये उभारतो. ज्यामुळे जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे, कुटुंबाकडे यावी, यामागचे मुख्य कारण असते. त्यामुळे गुढीवर कलश उलटा ठेवला जातो.

गुढीपाडवा शुभ मुहूर्त

यंदा 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:50 पासून सुरु होईल आणि 9 एप्रिल 2024 रोजी रात्री 8:30 वाजता समाप्त होईल. तसेच गुढीच्या पूजेसाठी सकाळी 6:02 ते 10:16 पर्यंतची वेळ शुभ असेल.


हेही वाचा :

First Published on: April 8, 2024 5:54 PM
Exit mobile version