पैशासाठी काय पण! कोटींच्या संपत्तीसाठी पतीला केले प्रियसीच्या स्वाधीन

पैशासाठी काय पण! कोटींच्या संपत्तीसाठी पतीला केले प्रियसीच्या स्वाधीन

पैशासाठी काय पण! कोटींच्या संपत्तीसाठी पतीला केले प्रियसीच्या स्वाधीन

पती- पत्नीमधील टोकाचे वाद विवाद मग घटस्फोट अशी अनेक प्रकरणे आपण ऐकून आहोत. पण या पती पत्नीमध्ये जेव्हा प्रियसीचे एंट्री होते आणि हे प्रकरण नेमके काय वळण घेऊ शकते हे भोपाळमधील एका केसमधून समोर आले आहे. भोपाळमध्ये एक पत्नीने करोडोच्या संपत्तीसाठी पतीला त्याच्या प्रियसीच्या हवाले केले आहे. भोपाळमधील कौटुंबिक न्यायालयात याप्रकरणाची एक केस दाखल झाली आहे.

विवाहित पतीचे त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या एका तरुणीसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. परंतु हे प्रेमसंबंध त्याच्या पत्नीस मान्य नव्हते. त्यामुळे तिने पतीसोबत असणाऱ्या प्रियसीकडून सव्वाशे करोडची संपत्ती घेऊन पतीला त्याच्या प्रियसीच्या हवाले केले. व कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. यावेळी प्रियसीने प्रियकाराच्या पत्नीला ६० लाख किंमतीचे डुप्लेक्स, २७ लाख रुपयांची रोकड आणि १ घर नावावर करु दिले आहे. यात विशेष बाब अशी आहे की, या पत्नीच्या अल्पवयीने मुलीनेनंतर कौटुंबीय न्यायालयच्या वकील सरिता राजानी यांच्या भेट घेत आपल्या आई वडीलांना पून्हा एकत्र आणण्यासाठी मदत करा अशी मागणी केली. यावेळी वकील सरिता राजानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील ४२ वर्षीय पतीचे ५४ वर्षीय प्रियसीसोबत गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु पतीचा यात काही दिवसांनी मृत्यू झाला. प्रियसीनेनंतर विवाह केले तिला आता १६ व १२ वर्षाच्या दोन मुली आहेत.

पितीने जीवंत असताना पत्नीकडे प्रियसीसह एकत्र राहण्याची मागणी केली. परंतु हे पत्नीला मान्य नव्हते व दोघांमध्ये टोकाचे वाद झाले. हे वाद मिटवण्यासाठी पत्नीच्या मुलीच्या सांगण्यावरुन वकील सरिता यांनी पत्नी आणि प्रियसीशी बातचीत केली. त्यानंतर प्रियसी प्रियकाराच्या पत्नीला जीवनभरासाठी साठवून ठेवलेल्या रक्कमेतील हिस्सा देण्यास तयार झाली.
यावेळी पतीने कार्टात सांगितले की, मला पत्नी आणि प्रियसी अशा दोघींसोबत राहायचे आहे. परंतु पत्नीला मान्य नव्हते. पण मी मुलींच्या कारणात्सव पत्नीला सोडू शकत नाही तसेच मला प्रियसीलाही सोडायचे नाही आहे. कारण त्याला प्रियसीसोबत राहणे तितकेच महत्त्वाचे वाटतत होते.

तर पत्नीने यावर प्रतिउत्तर देत सांगितले, आमचा १८ वर्षाचा संसार मोडला. कारण कोणत्याही परिस्थितीत पती प्रियसीला सोडून माझ्यासोबत राहण्यात तयार नव्हता, त्यामुळे मी पतीला घटस्फोट दिला. परंतु दुसरीकडे मुलींच्या भविष्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे पतीच्या प्रियसीचा प्रस्ताव मान्य केला.

First Published on: January 4, 2021 11:02 PM
Exit mobile version