Breaking: लॉकडाऊनचे काय करायचे? हे आता लोकांनीच ठरवावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Breaking: लॉकडाऊनचे काय करायचे? हे आता लोकांनीच ठरवावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“लॉकडाऊनचे काय करायचे? लॉकडाऊन वाढणार की कमी होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र लॉकडाऊनचे काय करायचे, हे आता लोकांनीच ठरवायचे आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. लॉकडाऊन वाढवण्यात कुणालाही रस नाही, पण सरकारचा नाईलाज आहे. तुम्ही लॉकडाऊनचे बंधन जेवढे टाळाल, तेवढा कोरोनाचा फास वाढत जाईल. त्यामुळे पुढचा काही काळ आपल्याला शारिरीक अंतर ठेवूनच काढावा लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आज सोशल मीडियावर लाईव्ह येत ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले.

औरंगाबाद येथे आज पहाटे घडलेली घटना दुःखद असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगून मजूरांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला. या घटनेमुळे मी मनातून व्यथित झालो आहे. “स्थलांतरीत मजूरांना मी याआधीही सांगत आलो आहे की, तुम्ही नाउमेद होऊ नका. महाराष्ट्र तुमची सगळी सोय करत आहेत. तुम्हाला मुळ राज्यात जाण्यासाठी राज्य मदत करेल. त्यामुळे परराज्यातील मजूरांनी सयंम ठेवावा, चिंता करु नये, महाराष्ट्र सरकार तुमच्याबाजूने आहे.”, असा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मजूरांना धीर दिला.

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि साखळी कायमचा संपवण्यासाठी आता आपण उपाययोजना घेणार आहोत. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात जास्तीत जास्त ग्रीन झोन कसे होतील, याचा प्रयत्न आपल्या सर्वांना करावा लागणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राने आतापर्यंत देशात सर्वाधिक कोरोनाच्या टेस्ट केलेल्या आहेत. एकट्या मुंबईने एक लाखाच्या आसपास टेस्ट झाल्या आहेत. तरिही मुबंईत अनेक रुग्णांचा मृत्यू झाला, त्याचे कारण म्हणजे अनेक रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांकडे आले होते. जर रुग्णांना लक्षणे दिसल्यानंतर जर त्यांनी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधल्यास त्यांना वाचवता आले असते.

सायन रुग्णालयातील घटना निषेधार्ह

सायन हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचा मृतदेह उघड्यावर ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतोच. मात्र डॉक्टर जर चुकीचे काम करणार असतील तर डॉक्टरांना देखील आम्ही सोडणार नाही. त्यांच्यावर देखील कारवाई करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

First Published on: May 8, 2020 8:27 PM
Exit mobile version