पनवेलमध्ये कोरोनाने वर्षभरात घेतला ७३१ जणांचा बळी !

पनवेलमध्ये कोरोनाने वर्षभरात  घेतला ७३१ जणांचा  बळी !

पनवेलमध्ये कोरोनाने वर्षभरात घेतला ७३१ जणांचा बळी !

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मागील वर्षभरात ७३१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा मृत्यूचा तांडव सुरु झाला आहे. मागील १७ दिवसात पनवेलमध्ये ५८ जणांना कोरोनाच्या प्रादुभावामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचे अतिगंभीर संकट आपल्या समोर आहे, त्यामुळे शासनाने लागू केलेले निर्बंध काटेकोरपणे पाळा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपलं महानगरशी बोलताना केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आणि मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाउन सुरु झाले. तब्ब्ल नऊ महिने कोरोनाने संपूर्ण देशवासियांना भयभीत केले. मागील दोन महिन्यात कोरोनाचे प्रमाण काहीसे कमी होतंय असे वाटत होते, मात्र अचानक पुन्हा एकदा कोरोनाने डोके बाहेर काढले आहे. एप्रिल महिन्यात सुरु झालेली कोरोनाची लाट अतिभयंकर असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्यशासनाने लॉक डाउन सुरु केला आहे.

या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाय योजना आखात कोरोची चेन ब्रेक करण्याचे काम सुरु आहे. मात्र, कडक निर्बंध लागू करून देखील काही लोक विनाकारण रस्त्यावर, सोसायटीच्या आवारात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोची चेन तोडण्यापेक्षा असे लोक कोरोनाचा प्रसार करून परिस्थिती आणखीच गंभीर बनवीत आहेत. त्यामुळेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. मागील १७ दिवसात पनवेलमध्ये ५८ जणांना कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती पनवेल मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधीकारी डॉ आनंद गोसावी यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर विभागामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पनवेल पालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण हे सर्वात जास्त खारघर परिसरात आहे. तर गेल्या वर्षभरात 12 हजार व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. पालिकेच्या अहवाल नुसार १ एप्रिल ते १७ एप्रिलच्या अहवाल नुसार खारघर मध्ये ११७ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.मागील १७ दिवसात खारघर मध्ये १५ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या अहवाल नुसार दिवसागणिक खारघर मध्ये जवळपास १५० हुन अधिक रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे खारघरवासियांना टाळेबंदीचे काटेकोर पालन करून कोरोनावर मात करावी, लागेल.


हेही वाचा – नवी मुंबईत कामोठे येथे पालिकेमार्फत २० आयसीयू बेड्सची सुविधा

First Published on: April 18, 2021 7:36 PM
Exit mobile version