Corona Live Update: मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

Corona Live Update: मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

मुंबई महापालिकेतील कोरोना पॉझिटिव्ह अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत चालला असून आता ही संख्या ३१ हजार ७८७ वर पोहोचली आहे. तर मृत्यूच्या आकड्याने हजाराचा टप्पा ओलांडला असून एकूण १००८ जणांचे मृत्यू झाले आहेत. मागच्या २४ तासांत देशात १८१३ नवे रुग्ण आढळले असून ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

 


स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि तीर्थयात्रेला गेलेले यात्रेकरू यांना आपल्या राज्यात घरी जाण्याचू सूट मिळाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

 

 


कोरोनाने जगभर थैमान घातलेलं असतानाच अमेरिकेत त्यानं हाहा:कार उडवून दिला आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येनं तब्बल १० लाखांचा आकडा पार केला आहे. तर आत्तापर्यंत अमेरिकेत हजारो नागरिकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.


गेल्या २ दिवसांमध्ये पुण्यातल्या ८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्यासोबतच्या इतर पोलिसांची देखील चाचणी करण्यात आली. सुदैवाने त्यातलं कुणीही पॉझिटिव्ह आढळलं नाही, अशी माहिती पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.


गुजरातमध्ये पोलिसांनी भाजी मार्केटसाठी सोशल डिस्टन्सिंगचं ‘भाजीमार्केट मॉडेल’ अंमलात आणलं आहे. भाजीवाल्यांना मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्ह्ज देखील पुरवण्यात आले आहेत.

First Published on: April 29, 2020 6:56 PM
Exit mobile version