Corona Live Update: नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या २३०वर!

Corona Live Update: नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या २३०वर!

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

नागपूरमध्ये २४ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून आता महाराष्ट्राच्या उपराजधानीतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या २३०वर पोहोचली आहे.


मुंबईत आत्तापर्यंत २५० पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी दिली आहे.


आज दुपारी २ वाजता विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते तसेच इतर सर्व प्रमुख राजकीय पक्ष नेते यांच्याशी कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार आहे. यात राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे.


मुंबईत आजपासून इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरची दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. याआधी दारूविक्रीच्या निर्णयानंतर मुंबईत झालेली गर्दी पाहून पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी शिथिल केलेले नियम पुन्हा कठोर केले होते. मात्र, आता आजपासून इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.


राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १६ हजारांच्या वर गेला असून एकूण रुग्णसंख्या १६ हजार ७५८च्या घरात पोहोचली आहे. बुधवारी एकाच दिवशी कोरोनाचे १२३३ नवे रुग्ण महाराष्ट्रात सापडले. त्यामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव अजूनही नियंत्रणात येत नसल्याचं चित्र आहे. धारावी झोपडपट्टीने मुंबईकरांची आणि सरकारचीही चिंता वाढवली असून आत्तापर्यंत धारावीमध्ये ७३३ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

First Published on: May 7, 2020 9:42 AM
Exit mobile version