Corona Live Update: नागपूर कारागृह सुद्धा लॉकडाऊन

Corona Live Update: नागपूर कारागृह सुद्धा लॉकडाऊन

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील सात  कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती या कारागृहाची  भर पडली असून, हे कारागृहही तातडीने लॉक डाऊन करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


देशातल्या प्रमुख बंदरातील पोर्ट ट्रस्ट कामगारांचा किंवा कंत्राटी कामगाराचा पोर्टमध्ये काम करीत असताना कोरोनामुळे मृत्यु झाल्यास संबंधित कामगाराच्या ५० लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केंद्र सरकारच्या नौकानयन मंत्रालयाने केली आहे. हा आदेश ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहिल. गोदीमध्ये काम करत असताना संबंधित कामगाराचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची पडताळणी पोर्टच्या चेअरमनने करून कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी असे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी जाहीर झालेला ५० लाख रुपयांचा वीमा फक्त पोर्ट ट्रस्ट रुग्णालयातील आरोग्य कर्मचा-यांना लागू केला होता.


कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. बुधवारी मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुणे महापालिकेच्या ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. अहोरात्र रस्त्यावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण सुरु झाली आणि त्यापाठोपाठ आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण लागण्यास सुरुवात झाली आहे.


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना गुरूवारी नव्याने सहा रूग्ण आढळून आले. त्यामुहे करोनोबाधितांची संख्या १६२ झाली आहे. डोंबिवली पूर्वेत एका २० दिवसाच्या नवजात बाळालाही करोनाची लागण झाली आहे.


कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर २४ तासांच्या आत अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश आता केंद्र सरकारने दिले आहेत.


मालेगावमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २५३ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांमध्ये मालेगावमध्ये ८२ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर आता मोठं आव्हान निर्माण झालं आहे.


देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे येत्या ३ मेनंतर नक्की कोणत्या भागातले लॉकडाऊनचे नियम शिथिल होतात आणि कोणते भाग लॉकडाऊनमध्ये कायम राहतात, याचा निर्णय लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. देशाचा विचार करता रुग्णसंख्या ३३ हजार ०५०वर पोहोचली आहे. यापैकी २३ हजार ६५१ रुग्ण सक्रिय असून ८ हजार ३२५ रुग्ण बरे झाल आहेत. मात्र, कोरोनाच्या बळींचा एक हजारांच्या वर गेलेला आकडा चिंता वाढवणारा ठरणार आहे. आत्तापर्यंत १ हजार ७४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये १ हजार ७१८ नवे कोरोना रुग्ण सापडले असून ६७ जणांचा मृत्यू झाला आहे.


लॉकडाऊन लागू असूनही विनाकारण बाहेर भटकणाऱ्यांना पंजाब पोलिसांनी असा इंगा दाखवला!


गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत कोरोनामुळे २५०२ जणांचा बळी गेला आहे.

First Published on: April 30, 2020 7:37 PM
Exit mobile version