Coronavirus Update: आज राज्यात १५७६ नवे रुग्ण; ४९ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात १५७६ नवे रुग्ण; ४९ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील आजची कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात शुक्रवारी १५७६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोना बाधितांची संख्या २९ हजार १०० झाली आहे. तर ४९ जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १०६८ वर पोहचली आहे. शुक्रवारी ५०५ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत ६५६४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये मुंबईमधील ३४, पुण्यात ६, अकोला २, कल्याण डोंबिवली २, धुळयात २, पनवेल १, जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २९ पुरुष तर २० महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये ( ६५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ पोर्टलनुसार राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग ११ दिवस इतका आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,५०,४३६ नमुन्यांपैकी २,२१,३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९,१०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १४७३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,१६७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५८.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ३,२९,३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १६,३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र | जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण | मृत्यू

१ मुंबई महानगरपालिका १७६७१ | ६५५
२ ठाणे १८९ ३
३ ठाणे मनपा १३०२ ११
४ नवी मुंबई मनपा ११७७ १४
५ कल्याण डोंबवली मनपा ४४४ ६
६ उल्हासनगर मनपा ८६ ०
७ भिवंडी निजामपूर मनपा ४१ २
८ मीरा भाईंदर मनपा २६० २
९ पालघर ४२ २
१० वसई विरार मनपा ३२१ ११
११ रायगड २१२ २
१२ पनवेल मनपा १८० १०
ठाणे मंडळ एकूण २१९२५ ७१८
१३ नाशिक ९९ ०
१४ नाशिक मनपा ६३ ०
१५ मालेगाव मनपा ६६३ ३४
१६ अहमदनगर ५६ ३
१७ अहमदनगर मनपा १५ ०
१८ धुळे १० ३
१९ धुळे मनपा ६४ ५
२० जळगाव १९० २३
२१ जळगाव मनपा ५६ ४
२२ नंदूरबार २२ २
नाशिक मंडळ एकूण १२३८ ७४
२३ पुणे १८५ ५
२४ पुणे मनपा ३१४१ १७२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५५ ४
२६ सोलापूर ९ १
२७ सोलापूर मनपा ३५६ २०
२८ सातारा १२६ २
पुणे मंडळ एकूण ३९७२ २०४
२९ कोल्हापूर १९ १
३० कोल्हापूर मनपा ६ ०
३१ सांगली ३७ ०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ७ १
३३ सिंधुदुर्ग ७ ०
३४ रत्नागिरी ८६ ३
कोल्हापूर मंडळ एकूण १६२ ५
३५ औरंगाबाद ९५ ०
३६ औरंगाबाद मनपा ६८३ २०
३७ जालना २१ ०
३८ हिंगोली ६६ ०
३९ परभणी ५ १
४० परभणी मनपा १ ०
औरंगाबाद मंडळ एकूण ८७१ २१
४१ लातूर ३२ १
४२ लातूर मनपा ० ०
४३ उस्मानाबाद ६ ०
४४ बीड १ ०
४५ नांदेड ५ ०
४६ नांदेड मनपा ५२ ४
लातूर मंडळ एकूण ९६ ५
४७ अकोला १९ १
४८ अकोला मनपा २०७ १३
४९ अमरावती ६ २
५० अमरावती मनपा ९२ ११
५१ यवतमाळ ९९ ०
५२ बुलढाणा २६ १
५३ वाशिम ३ ०
अकोला मंडळ एकूण ४५२ २८
५४ नागपूर २ ०
५५ नागपूर मनपा ३३२ २
५६ वर्धा २ १
५७ भंडारा १ ०
५८ गोंदिया १ ०
५९ चंद्रपूर १ ०
६० चंद्रपूर मनपा ४ ०
६१ गडचिरोली ० ०
नागपूर एकूण ३४३ ३
इतर राज्ये ४१ १०

एकूण २९१०० | १०६८

First Published on: May 15, 2020 8:48 PM
Exit mobile version