Corona Live Update: रेडझोनमध्ये लॉकडाऊन ३० मे पर्यत वाढवा – रामदास आठवले

Corona Live Update: रेडझोनमध्ये लॉकडाऊन ३० मे पर्यत वाढवा – रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे तसेच ठाणे या रेड झोन भागात तर रुग्ण वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, रेडझोन भागात लॉकडाऊन वाढवावा अशी मागणी आता जोर धरू लागली असून, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रेड झोनमधील भागातील लॉकडाऊन ३० मे पर्यंत वाढवावा,  अशी मागणी केली आहे.
दिल्ली एनसीआर परिसरात ३.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाचे केंद्र हे ईशान्य दिल्लीच्या वझीरपूर येथे आहे. दिल्ली-यूपीच्या सीमारेषेवर हा भूकंप झाला असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची वित्त किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.  
भायखळातील महिला कारगृहातील ५४ वर्षीय महिला कैद्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ८ मे रोजी या महिलेची पहिली कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण पुन्हा ९ मे रोजी कोरोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट मध्ये कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती भायखळा तुरुंग प्रशासनाने दिली आहे.
एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ७२ तासांपूर्वी विमान उड्डाण घेण्याआधी कोरोनाची चाचणी केल्यानंतर पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे वैमानिक चीनला वैद्यकीय पुरवठा करत होते.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६२ हजारवर पोहोचले आहे. त्यापैकी २ हजार १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या २० हजार २२८ आहे.  
राज्यात गेल्या २४ तासांत ७२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात एकूण ७८६ कोरोनबाधित पोलिस आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत कोरोनामुळे सात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाबाधित पोलिसांच्या आकड्यात ८८ पोलिस अधिकारी आहे तर ६९८ पोलिस कर्मचारी आहेत.  
कांदिवली येथील पहाटे पाच वाजताच्या दरम्यान दिपज्येती चाळीत एक दुमजली घराचा काही भाग कोसळला. यामध्ये अडकलेल्या १४ जणांना अग्निशमन दल, एनडीआरएपच्या जवानांनी बाहेर काढले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी येण्यापूर्वी दोन जणांना उपचारकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान शोधकार्य करत आहेत.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४१ लाखांहून अधिक झाली आहे. सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळले असून १३ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोनामुळे १ हजार ५६८ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ७८ हजार ७४६वर पोहोचला आहे.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल राज्यात १ हजार १६५ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २० हजार २२८ इतकी झाली आहे. तसंच काल राज्यात कोरोनामुळे ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ७७९ झाला आहे. आतापर्यंत ३ हजार ८०० कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे.
First Published on: May 10, 2020 4:23 PM
Exit mobile version