Corona Live Update: ७ वर्षाहून कमी शिक्षा असलेले ११ हजार कैदी मुक्त होणार..

Corona Live Update: ७ वर्षाहून कमी शिक्षा असलेले ११ हजार कैदी मुक्त होणार..

गृहमंत्री देशमुखांचे पोलिसांना आदेश

राज्याच्या गृहविभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ६० तुरुगांतील जवळपास ११ हजार कैदांना तातडीने पारोल देण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.    
आतापर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झाला नव्हता. यापैकीच एक सिंधुदुर्ग जिल्हा होता. मात्र आता सिंधुदुर्गात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला आहे. कर्नाटकमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कणकवली येथील नागरिकाला करोनाची लागण झाली आहे.
राज्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे.  
  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनाकडून आज जाहीर करण्यात आले.
राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात करोनाची लागण १२६ जणांना झाली आहे. या पाठोपाठ केरळमध्ये देखील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये आतापर्यंत १०९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या देशातील करोना वाढता प्रसार पाहून संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसंच आतापर्यंत देशभरातील करोनाबाधितांचा आकडा ६०६वर पोहोचला आहे.
admin

करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये व वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे . राज्यातील सर्व जिल्हयाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागात देखील बघायला मिळत असून बाहेर जिल्ह्यातील किंवा अनोळखी इसम गावातच येऊ नये म्हणून आता गावा गावातील रस्तेच बंद करून गावबंदी करण्यात आली आहे. गावात येऊ नका असे जाहीर फलक तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनी लावले आहेत. शहापूर तालुक्यातील काही गावांचे प्रवेशद्वार ग्रामस्थांनी बंद केले आहेत.

Pravin Wadnere

एक लाख ७० हजार कोटींच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या ८ भागांची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

Pravin Wadnere

आठ – डिस्ट्रिक्ट मिनरल फंड

आम्ही राज्य सरकारांना विनंती केली आहे की हा निधी मेडिकल टेस्टिंग, स्क्रीनिंग आणि करोनाशी लढा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी वापरला जावा.

Pravin Wadnere

आठ – बांधकाम कामगारांसाठी

३.५ कोटी नोंदणीकृत कामगार आहेत. त्यांच्यासाठी ३१ हजार कोटींचा निधी वापरला जाईल. राज्य सरकारांना आम्ही हा निधी या कामगारांसाठी वापरला जावा याचे निर्देश दिले आहेत.

Pravin Wadnere

सात – ईपीएफओसंदर्भात दोन घोषणा –

पहिली त्यांच्या पीएफ खात्यासंर्भात – कर्मचारी (१२ टक्के) आणि मालक(१२ टक्के) या दोघांचे मिळून २४ टक्के हिस्सा पुढचे ३ महिने केंद्र सरकारकडून भरले जातील. हे त्या कंपन्यांसाठी असेल, ज्यांच्याकडे १०० कर्मचारी आहेत आणि ज्यातले ९० टक्के कर्मचारी असे असतील, जे १५ हजार प्रतिमहिना पेक्षा कमी कमावतात.

दुसरी घोषणा – ईपीएफओच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. ईपीएफओमधल्या त्यांच्या पैशापैकी ७५ टक्के पैसे किंवा ३ महिन्यांत जमा होणारा निधी यापैकी जो काही निधी कमी असेल तो कर्मचारी काढून घेऊ शकतात.

याचा ४ कोटी कामगारांना फायदा मिळू शकेल…

First Published on: March 26, 2020 8:25 PM
Exit mobile version