Corona Live Update: NEET परीक्षा पुढे ढकलली

Corona Live Update: NEET परीक्षा पुढे ढकलली
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मानव संसाधन विकास मंत्रालयाने यंदाची नीट 2020 ची परिक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 3 मे रोजी घेण्यात येणार होती. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर नीट परिक्षेचे आयोजन करण्यात येते. 2 डिसेंबर 2019 ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधी या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरून घेण्यात आले होते. या परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड शुक्रवारपासून (ता.27) देण्यात येणार होते. परंतु आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत असल्याने राज्य सरकारने विविध परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 14 एप्रिलला या परीक्षेबाबत पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा अ‍ॅडमिट कार्ड जारी करायचे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

वसईत दुबईहुन आलेल्या एका इसमाला करोनाची लागण झाली असून त्याला मुबंईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 27 वर्षीय तरुण 22 मार्चला दुबईहुन वसईत आला होता. त्याने स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले होते. पण, 25 तारखेला तब्येत बिघाडल्याने त्याने खासगी डॉक्टरकडे धाव घेतली होती. त्यावेळी करोनाची लक्षणे असल्याने तो कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याची चाचणी आज पॉसिटीव्ह आल्यावर करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याआधी गेल्या आठवड्यात एकाला करोनाची लागण झाली होती.
 
“सध्या देश आणि राज्यासमोर मोठे संकट आहे. मात्र आपण सगळे मिळून त्यावर मात करु. परराज्यातील काही लोक दुधाच्या टँकरमध्ये, टेम्पोत खचून भरून आपापल्या राज्यात जात आहेत. पण या संकटाच्या काळात मला हे सांगायचे आहे की तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. कुठेही जाऊ नका. तुमची जबाबदारी राज्य सरकारची आहे. तसेच इतर राज्यातील कामगार ज्या ज्या ठिकाणी आहेत. तिथल्या काही संस्थांनीही मदतीसाठी पुढे आले पाहीजे. माणूस जगवायचा असेल तर माणूसकी जगवावी लागेल आणि तेच आम्ही करत आहोत.”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये केले.    
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात सोशल मीडियावर लाईव्ह येणार आहेत. करोनासंबंधित रुग्णांची माहिती. राज्य सरकारच्या उपाययोजना आणि लॉकडाऊन संबंधी महत्त्वाचे निर्देश या माध्यमातून ते देणार आहे.  

करोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्राध्यापक एक दिवसाचे वेतन देणार

करोनाशी दोन हात करण्यासाठी आपले एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापकांनी घेतला आहे. यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने पुढाकार घेत सर्वच प्राध्यापकांनी वेतन देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे. देशात ६०० पेक्षा अधिक रुग्ण करोनाचे आढळून आले. या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. याला आता प्राध्यापकांनीही पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन जमा करावे, असे आवाहन आता महासंघाने केले आहे. महासंघाशी सलग्नीत असणाऱ्या राज्यातील विविध विद्यापीठातील सर्व संघटनांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती महासंघाचे महाराष्ट्र प्रांत महासचिव प्रा. वैभव नरवडे यांनी दिली. महासंघाच्या पुढाकारातून शासनातर्फे येत्या काळात करण्यात येणाऱ्या आवाहनाला शिक्षकांनी प्रतिसाद द्यावा असे देखील प्रांत अध्यक्ष प्रदीप खेडकर यांनी सर्व सलग्नीत शिक्षक संघटनांना आवाहन केले आहे.
राज्यात करोनाबाधितांचा दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या १२५वर पोहोचली असून काल एका दिवसांत पुन्हा एकदा तीन नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर मृतांचा आकडा हा ५वर पोहोचला आहे. या दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Priyanka Shinde

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. तसंच रक्ताला दुसरा पर्याय नसल्यामुळे संचार बंदीच भान राखून रक्तदान करावं – राजेश टोपे

Priyanka Shinde

रक्तदान करण्याचं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.

Priyanka Shinde

महासंकटात खासगी डॉक्टरांनी असंवेदनशिलता दाखवू नका – राजेश टोपे

Priyanka Shinde

राज्यातील दवाखाने सुरू राहावेत अशी विनंती खासगी डॉक्टरांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

Priyanka Shinde

तसंच आता करोना रुग्णांच्या डिस्चार्जची संख्या वाढेल – राजेश टोेपे

First Published on: March 27, 2020 10:55 PM
Exit mobile version