Corona Live Update: NEET परीक्षा पुढे ढकलली

Corona Live Update: NEET परीक्षा पुढे ढकलली
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मानव संसाधन विकास मंत्रालयाने यंदाची नीट 2020 ची परिक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 3 मे रोजी घेण्यात येणार होती. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर नीट परिक्षेचे आयोजन करण्यात येते. 2 डिसेंबर 2019 ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधी या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरून घेण्यात आले होते. या परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड शुक्रवारपासून (ता.27) देण्यात येणार होते. परंतु आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत असल्याने राज्य सरकारने विविध परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 14 एप्रिलला या परीक्षेबाबत पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा अ‍ॅडमिट कार्ड जारी करायचे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

वसईत दुबईहुन आलेल्या एका इसमाला करोनाची लागण झाली असून त्याला मुबंईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 27 वर्षीय तरुण 22 मार्चला दुबईहुन वसईत आला होता. त्याने स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले होते. पण, 25 तारखेला तब्येत बिघाडल्याने त्याने खासगी डॉक्टरकडे धाव घेतली होती. त्यावेळी करोनाची लक्षणे असल्याने तो कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याची चाचणी आज पॉसिटीव्ह आल्यावर करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याआधी गेल्या आठवड्यात एकाला करोनाची लागण झाली होती.
 
“सध्या देश आणि राज्यासमोर मोठे संकट आहे. मात्र आपण सगळे मिळून त्यावर मात करु. परराज्यातील काही लोक दुधाच्या टँकरमध्ये, टेम्पोत खचून भरून आपापल्या राज्यात जात आहेत. पण या संकटाच्या काळात मला हे सांगायचे आहे की तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. कुठेही जाऊ नका. तुमची जबाबदारी राज्य सरकारची आहे. तसेच इतर राज्यातील कामगार ज्या ज्या ठिकाणी आहेत. तिथल्या काही संस्थांनीही मदतीसाठी पुढे आले पाहीजे. माणूस जगवायचा असेल तर माणूसकी जगवावी लागेल आणि तेच आम्ही करत आहोत.”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये केले.    
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात सोशल मीडियावर लाईव्ह येणार आहेत. करोनासंबंधित रुग्णांची माहिती. राज्य सरकारच्या उपाययोजना आणि लॉकडाऊन संबंधी महत्त्वाचे निर्देश या माध्यमातून ते देणार आहे.  

करोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्राध्यापक एक दिवसाचे वेतन देणार

करोनाशी दोन हात करण्यासाठी आपले एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापकांनी घेतला आहे. यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने पुढाकार घेत सर्वच प्राध्यापकांनी वेतन देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे. देशात ६०० पेक्षा अधिक रुग्ण करोनाचे आढळून आले. या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. याला आता प्राध्यापकांनीही पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन जमा करावे, असे आवाहन आता महासंघाने केले आहे. महासंघाशी सलग्नीत असणाऱ्या राज्यातील विविध विद्यापीठातील सर्व संघटनांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती महासंघाचे महाराष्ट्र प्रांत महासचिव प्रा. वैभव नरवडे यांनी दिली. महासंघाच्या पुढाकारातून शासनातर्फे येत्या काळात करण्यात येणाऱ्या आवाहनाला शिक्षकांनी प्रतिसाद द्यावा असे देखील प्रांत अध्यक्ष प्रदीप खेडकर यांनी सर्व सलग्नीत शिक्षक संघटनांना आवाहन केले आहे.
राज्यात करोनाबाधितांचा दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या १२५वर पोहोचली असून काल एका दिवसांत पुन्हा एकदा तीन नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर मृतांचा आकडा हा ५वर पोहोचला आहे. या दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Priyanka Shinde

आतापर्यंत देशभरात ७२२ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५० करोनाचे रुग्ण रिकव्हर झाले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

करोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये!

देशात पाहायला गेले तर सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले होते. मात्र आता केरळमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली असून सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे केरळमध्ये आढळले आहेत. आतापर्यंत केरळमध्ये १३७ रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात १२५ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

सविस्तर वाचा –

CoronaVirus: बापरे! केरळमध्ये वेगाने वाढतोय करोनाग्रस्तांचा आकडा!
Priyanka Shinde

जगभरातील करोनाग्रस्तांचा आकडा हा आता ५ लाखांहून अधिक झाला आहे. आतापर्यंत जगभरातील करोनाबाधितांची संख्या ५ लाख ३४ हजार ३८६वर पोहोचली आहे. तर यापैकी २४ हजार ०७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच महत्त्वाचीबाब म्हणजे यापैकी १ लाख १९ हजार ९८७ करोनाचे रुग्ण व्हायरस फ्री झाले आहेत.

Priyanka Shinde

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले

गुरुवारी संध्याकाळ सदर महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर अल्पवधीतच त्या महिलेचा मृत्यू झाला. नेमके कारण आम्ही तपासत आहोत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरातील १५ करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात गुरुवारी एकूण २६९ जण विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३ हजार २४३ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २हजार ७५० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

First Published on: March 27, 2020 10:55 PM
Exit mobile version