फ्रान्स राष्ट्राध्यक्षांविरोधात भारतात निदर्शने दुर्दैवी

फ्रान्स राष्ट्राध्यक्षांविरोधात भारतात निदर्शने दुर्दैवी

भोपाळमधील इकबाल मैदानावर मुस्लीम समाजाने फ्रान्सविरोधात रॅली केली. योगगुरु बाबा रामदेव यांनी त्यावर आक्षेप घेतला असून फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात भारतात एका विशिष्ट समाजाने केलेली निदर्शने अत्यंत दुर्दैवी असल्याचे, योग गुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, सरकारने अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

बाबा रामदेव यांनी देशातील मुस्लिमांच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, नेहमी-नेहमी एकाच समाजाचे लोक का आग लावायला सुरुवात करतात? मग हिंदूही विचार करतील, की आगच लावावी. आपण आपल्या मान्यतांवर विश्वास ठेवा, मात्र, संपूर्ण जगावर तर हे थोपू शकत नाही. स्वतःप्रति दृढ रहा आणि इतरांप्रति उदार रहा. स्वधर्म निष्ठा, परधर्म सहिष्णुता ठेवा, रामदेव म्हणाले, ध्रुवीकरणाचे घृणास्पद राजकारण संपायला हवे. यावर लगाम लागायला हवा.

रामदेव म्हणाले, धार्मिक उन्मादामुळेच जगभरात युद्धे होतात. आजवर जगभरात झालेल्या लढायांचे सर्वात मोठे कारण हे धार्मिक उन्माद आहे. धार्मिक दंगे आहेत. यावेळी, पैगंबर मोहम्मद, येशू ख्रिस्त, गुरुनानक देव जी, भगवान महावीर, बुद्ध, भगवान राम, कृष्ण, शिव, कुठल्याही महापुरुषाने धार्मिक कट्टरतेसंदर्भात भाष्य केले आहे? असा सवाल करत, कधीच नाही, असे बाबा रामदेव म्हणाले.

First Published on: October 31, 2020 6:13 AM
Exit mobile version