Thackeray memorial live update: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला

Thackeray memorial live update: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला
चाफ्याचे झाप लावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृक्षारोपण केले
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण होत आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा संपन्न
ठाण्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात देखील कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमस्थळी पोहोचले
थोड्याच वेळात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि प्रसिध्द क्रिकेटपटू रवि शास्त्री यांनी आज (३१ मार्च) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
ठाणे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे भूमिपूजन सोहळ्याला प्रत्यक्ष हजर राहणार, सुभाष देसाईंची माहिती
सचिन वाझे प्रकरणात रियाझ काझी, होवाळेंची आज पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता काढी आणि होवाळे एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत.
माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच.डी. देवेगौडा आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे.
शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याची प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दिली आहे. हसन मुश्रीफ यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. ५ ते १० मिनिटे शरद पवारांशी चर्चा केली असल्याचे सांगितले आहे.
खासदार जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मागणी केली आहे.
स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भुमिपूजन आज सोहळा पार पडणार आहे. या भुमिपूजन सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निमंत्रण देण्यात आले नाही आहे. याच पार्श्वभूमीवरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, ‘स्वर्गीय मा.बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही.’
या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाला का बोलावले नाही असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर पहिले आमंत्रण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिले असते. बाळासाहेब मनाचा राजा माणूस! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत! असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
मुंबई क्राईम ब्रँच कक्ष दोनचे पोलीस निरीक्षक मिलिंद मधुकर काठे यांच्याकडे गुन्हे गुप्तवार्ती विभागाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेनेकडून शिवजयंती साजरी केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विलेपार्लेमध्ये दाखल झाले असून शिवयरांना त्यांनी अभिवादन केले आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिक आता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. कायदेतज्ज्ञ मुकुल रोहतगी परमबीर यांची बाजू मांडत आहेत.
भाजप नेते नारायण राणे सपत्निक शरद पवारांच्या भेटीला ब्रँची कँडी रुग्णालयात पोहोचली आहेत. यावेळेस भाजप आमदार नितेश राणे देखील पवारांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
नाशिकमधील देवळा तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. जनता कर्फ्यूही लावण्यात आला आहे.
एरोलीत पीएनबी बँकेच्या ए़टीएमला आग
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवद्र फडणवीस यांना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रितामध्ये जागा देण्यात आली नाही. फडणवीस यांना या कार्यक्रमाचे कसलेही निमंत्रण देण्याचे ठाकरे सरकारने टाळल्यामुळे आता नविनच राजकारण सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
औरंगाबाद लॉकडाऊन रद्द, खासदार जलील यांचा जल्लोष; कोरोनाचे नियम पायदळी औरंगाबादमध्ये आजपासून सुरु होणारा लॉकडाऊन रद्द झाला आहे. यामुळे इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी मंगळवारी काल जलील यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. यावेळी जलील यांना कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून जंगी मिरवणूक काढून जल्लोष केला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शरद पवार यांना गॉल ब्लेडरचा त्रास होत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपाचरादरम्यान त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्याचे समोर आले होते. मंगळवारी रात्री शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर उशिरा रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची अधिकृत माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
First Published on: March 31, 2021 5:39 PM
Exit mobile version