ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळा वसतिगृह सुरू करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळा वसतिगृह सुरू करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कोविड १९ विषयक सर्व नियमांचे पालन करून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेली सर्व शासकीय वसतिगृहे, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य आश्रमशाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी आज काढले आहे.

जिल्ह्यातील कोवीड १९ चा प्रादुर्भाव कमी होत असून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. तसेच जिल्ह्यातील इयत्ता १ ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यापार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आदिवासी विकास विभागाच्याअंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, एकलव्य आश्रमशाळा पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश नार्वेकर यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार, राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत प्रत्यक्ष उपस्थित रहावे लागेल. तसेच त्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले असावे. तसेच आश्रमशाळांमधील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरणासाठी शाळेत नियोजन करण्याच्या सूचनाही नार्वेकर यांनी दिले आहेत.


हेही वाचा : समीर वानखेडे यांची ठाण्यात आठ तास चौकशी, कोपरी पोलीस ठाण्यात झाले वकिलांसह हजर

First Published on: February 23, 2022 10:38 PM
Exit mobile version