Accident In Yavatmal : ट्रक-ट्रॅक्टर ट्रेलरच्या अपघातात 70 बकऱ्यांसह दोन जणांचा जागीच मृत्यू

Accident In Yavatmal : ट्रक-ट्रॅक्टर ट्रेलरच्या अपघातात 70 बकऱ्यांसह दोन जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ : राज्यातील रस्ते अपघातांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. नुकताच यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आयशर ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रेलरचा अपघात झाला असून, या अपघातात दोन जणांचा जागीत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच, आयशर वाहनातून नेण्यात येत असेलल्या 70 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. (Eicher truck and trailer accident in yavatmal two people and 70 died on the spot)

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील उमरी सायखेडा येथे मालवाहू आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात आयशरमधील 70 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात तब्बल 70 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने बार मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर, वाहनातील दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यवतमाळमधील हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोन्ही मोठ्या वाहनांचा चुरंडा झाल्याचे दिसून येत आहे. अपघातामधील गंभीर जखमींना उपचारासाठी अर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले असून पंचनामा करण्यात येत आहे.

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदती केली. आयशर ट्रकमधील जखमी बकऱ्यांनाही गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तत्पूर्वीच मोठ्या प्रमाणात बकऱ्या मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रस्ते अपघातात वाहनाची गती आणि ओव्हरटेकमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे खराब व अरुंद रस्त्यामुळेही अपघाताच्या घटना घडत आहेत.


हेही वाचा – Manor Accident:महामार्गावर तीन गाड्यांच्या अपघातात एकाचा मृत्यू

Edited By – Vaibhav Patil

First Published on: May 2, 2024 6:03 PM
Exit mobile version