सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कला शेतकर्‍यांचा विरोध

सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कला शेतकर्‍यांचा विरोध

सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कला शेतकर्‍यांचा विरोध

सिडकोच्या नव्याने उभारल्या जाणार्‍या लॉजिस्टिक पार्ककरिता धुतूम गावात आयोजण्यात आलेली जनसुनावणी ग्रमस्त आणि शेतकर्‍यांच्या तीव्र विरोधानंतर सिडकोला आटोपती घ्यावी लागली आहे. बुधवारी ही सुनावणी लावण्यात आली होती.
नवी मुंबई प्रकल्पाकरिता देण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला आणि रोजगार या विषयावर शेतकर्‍यांना आणि त्यांच्या वारसांना बेवारस सोडणार्‍या सिडकोच्या अधिकार्‍यांवर या सुनावणीवेळी शेतकर्‍यांनी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना रोखून धरले. शेतकर्‍यांप्रति सिडकोच्या वर्तणुकीचा दाखला देत बैठकीत लॉजिस्टिक पार्कला तीव्र विरोध दर्शवण्यात आला. सिडकोच्या भूसंपादन विभागाचे सतीशकुमार खडके, अपर जिल्हाधिकारी प्रमदा बिडवे, अतिरिक्त मुख्य भूमी आणि भूमापन अधिकारी या सुनावणीवेळी उपस्थित होते. सुनावणीवेळी सिडकोच्या अधिकार्‍यांनी लॉजिस्टिक पार्कच्या योजनेची माहिती दिली.

यावर शेतकर्‍यांनी संयमाने प्रश्न करत सिडकोच्या अधिकार्‍यांची बोलती बंद केली. सिडकोच्या साडेबारा टक्के आणि साडेबावीस टक्के पॅकेजचा तरुणांनी पोलखोल केला. यापूर्वी बाधित झालेल्या गावांच्या गावठाण विस्तार योजनेचे काय झाले, या प्रश्नावर तर सिडको अधिकारी निरुत्तर झाले. मुळ गावठाणाबाहेरील घरांना बजावण्यात आलेल्या नोटीसा आधी मागे घ्या, असा आग्रह शेतकर्‍यांनी केला. तेव्हा विस्तारित गावठाणे क्षेत्रातील जमीन वगळली जाईल, असे सतीशकुमार खडके यांनी स्पष्ट केले. प्रकल्पांतील कामेही ठराविक पुढार्‍यांना दिली जात असल्याबद्दलही आक्षेप नोंदवण्यात आला.


हेही वाचा – कोरोनात रुग्णसेवेचा वसा घेतलेला रायगडचा देवदूत


 

First Published on: August 19, 2021 5:52 PM
Exit mobile version