भिवंडीत मोबाइलमध्ये गेम खेळू न दिल्याने मुलीची आत्महत्या

भिवंडीत मोबाइलमध्ये गेम खेळू न दिल्याने मुलीची आत्महत्या

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनावर नियंत्रन मिळवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे घरात बसून लोक टीव्ही किंवा मोबाइलमध्ये व्यस्त असतात. अशातच भिवंडी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी न्यू टावरे कंपाउंड येथील एक 15 वर्षीय मुलगी टीव्ही पाहत असताना मोबाईलमध्ये गेम खेळत होती. त्यावेळी टीव्ही बघत असताना मोबाइलमध्ये गेम का खेळते अशी विचारना करुन आई रागावली. आई आपल्यावर रागावल्यामुळे मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव कोमल रवींद्र सलादल्लू आहे. लॉकडाऊनमध्ये घरातच असल्याने ती टीव्ही पाहत होती. त्याचवेळी ती मोबाइलवर गेमही खेळत होती. त्याचवेळी तिची आई त्या ठिकाणी आली आणि तिच्यावर रागवली.

 

आई आपल्यावर रागवली हे मनात धरून तिने पहिल्या मजल्यावर जाऊन सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिची मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. व कायदेशीर प्रक्रिया केली आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह स्व. इंदीरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या मृत्यूबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याने याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

 

First Published on: April 20, 2021 2:01 PM
Exit mobile version