सायनमधील बेवारस नवजात चिमुरडीला मदतीचा ओघ अन् दत्तक पालकत्वासाठी पुढाकारही

सायनमधील बेवारस नवजात चिमुरडीला मदतीचा ओघ अन् दत्तक पालकत्वासाठी पुढाकारही

सायनमधील बेवारस नवजात चिमुरडीला मदतीचा ओघ अन् दत्तक पालकत्वासाठी पुढाकारही

कोरोनाच्या काळात लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र सायन येथे घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सायन येथील जैन गृहनिर्माण संस्था,१४६ बी येथे एक नवजात चिमुरडी बेवारसपणे आढळून आली. पोलिसांना कळताच त्यांनी नवजात चिमुरडीला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते चिराग शाह यांनी आपल्या स्वत:च्या मुलाला अशाप्रकारे रस्त्यावर सोडल्याप्रकरणी अज्ञान व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गोड आणि निरागस चिमुरडीला आई वडिलांनी का टाकले असेल असा प्रश्न सर्वाना पडला आहे. विशेष म्हणजे या बाळाला मदत करण्यासाठी अनेक लोक पुढे आले आहेत. त्याचप्रमाणे अनेकांनी बाळाचे पालकत्व स्वीकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सायन वेलफेयर फोरम आणि वडाळा सिटीझन फोरमचे संचालक शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या एका जैन सामाजातील मित्राने बाळाविषयी सांगितले. शाह यांनी त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर बाळ जिथे सापडले तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एक बाई त्या बाळाला मागच्या बाजूला सोडून गेल्याचे आढळून आहे. ती बाई बाळाची आई असावी असा अंदाज लावण्यात येत आहे.

बाळाच्या डायपरवरुन हे बाळ सायन रुग्णालयात एका आठवड्यापूर्वी जन्मल्याचे स्पष्ट झाले आहे. सायन रुग्णालयातील एका आठवड्यात झालेल्या सर्व प्रसूती बाळांची माहिती पोलिसांनी काढली. त्यातील एका बाळाच्या पालकाची माहिती मिळू शकली नाही. त्या पालकाचे लोकेशन पोलीस शोधत आहेत. बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी बाळाचा एक फोटोही पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे.

आई वडिलांनी बेवारस सोडलेल्या या छोट्या चिमुकलीच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले आहेत. द फ्री प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शाह यांना आतापर्यत बाळाला दत्तक घेण्यासाठी ३ फोन आणि मेसेज आले आहेत. या घटनेविषयी शाह यांना विचारले असता त्यांनी सांगितले, मला बाळाबद्दल खूप वाईट वाटते. माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. माझी पत्नी मला विचारत होती या सगळ्यात त्या बाळाची काय चुक आहे? तिने काहीही चुक केलेली नसताना तिला विनाकारण त्रास का सहन करावा लागतो आहे? असे ते म्हणाले.


हेही वाचा – VIDEO: मित्रासोबतचा सेल्फी मोबाईलवर ठेवला, पतीने संशय घेतल्यावरुन पत्नीची ट्रेन खाली आत्महत्या

 

First Published on: May 10, 2021 9:42 AM
Exit mobile version