LIVE UPDATES: चिंताजनक! पुण्यात दिवसभरात ९५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

LIVE UPDATES: चिंताजनक! पुण्यात दिवसभरात ९५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

पुण्यात आज दिवसभरात ९५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ३ हजार ६२८ नवे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ६८ हजार ८३२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ६ हजार १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेने दिली आहे.


सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील राबोडी येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रिव्हॉल्व्हर हस्तगत केले असून राबोडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी युएनजीएला संबोधित करणार आहेत.


गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार ८७६ नवे रुग्ण आढळले असून ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९४ हजार १७७वर पोहोचला आहे. यापैकी ८ हजार ७०३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १७ हजार ७९४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा १३ लाख ७७५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३४ हजार ७६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचे जबाब एसआयटीने आज नोंदवले आहे. त्याचे विश्लेषण करून कोर्टासमोर हजर केले जाईल, असे मुंबईचे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचाक मुठा अशोक जैन म्हणाले.


राज्यात गेल्या २४ तासांत २८१ नवे कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आढळले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २२ हजार २६९वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २३९ पोलिसांचा मृत्यू झाला असून १८ हजार ७११ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ हजार ३१९ पोलीसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.


देशभरातील कोरोनाच्या दरम्यान नुकतीच आयोजित केलेले पावसाळी अधिवेशन हे एक आव्हानात्मक होते, परंतु भारताची लोकशाही मजबूत आहे आणि लोकांचा त्यावर विश्वास आहे, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले.

 


भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते मात्र, कालपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहेत. तर दुसरीकडे दहशतवाद्यांनी  शोपिया इथे सचिवालयात तैनात असलेल्या जवानांवर फायरिंग केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  या भागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू

२९ नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभेचा कार्यकाळ असून बिहार निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू; बिहार निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार


रकुलप्रीत सिंहची चौकशी सुरू

अभिनेत्री रकुलप्रीत सिंहची NCB ने चौकशी सुरु केली आहे. सोबतच धर्मा प्रोडक्शनचे दिग्दर्शक क्षितिज प्रसाद देखील एनसीबीच्या ताब्यात आहेत. तर दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश एनसीबी गेस्टहाऊसवर दाखल झाले आहेत


देशातील शेतकऱ्यांना सशक्त करणं महत्त्वाचं

देशातील शेतकऱ्यांना आफवांपासून वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. तसेच देशातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल करणं हे आपली जबाबदारी आहे.


अभिनेता अर्जुन रामपाल याने कोरोनावर मात केली असून त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे ट्विट करून सांगितले आहे.


कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५८ लाखांच्या पार


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशात एका दिवसात विक्रमी कोरोना चाचण्यांचीही नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ लाखांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे. दिवसभरात १३ लाख ८० हजार चाचण्या करण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.


बिहार निवडणुकांच्या तारखा आज होणार जाहीर


दिल्लीच्या तिहार तुरूंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.


पुन्हा एकदा पुणे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महामेट्रोच्या कामाच्या पाहणीसाठी सकाळी ६ वाजता दौरा केला. सकाळी ६ वाजताची वेळ दिलेले पवार पावणेसहा वाजताच पोहचले. त्यामुळे महामेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या शुक्रवारी पिंपरी चिंचवडमधील तर आज पुणे स्टेशनजवळील कामाचा पवारांनी आढावा घेतला.


देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र असले तरी येथील रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. पण वाढता मृत्यूदर राज्यातील चिंता वाढवत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १९ हजार १६४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४५९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाख ८२ हजार ९६३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३४ हजार ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ टक्के एवढा आहे.

First Published on: September 25, 2020 11:54 PM
Exit mobile version