Live Update: ठाण्याच्या वाघबीळ उड्डाणपुलावर भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

Live Update: ठाण्याच्या वाघबीळ उड्डाणपुलावर भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

ठाण्यातील वाघबीळ उड्डाणपुलावर भीषण अपघात

ठाण्यातील वाघबीळ उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला असून पुलावरून जाणारा एक ट्रक कलंडल्याने त्यावर असलेलं कार्डबोर्डचे सर्व सामन पुलाखालून जाणाऱ्या गाडीवर पडले. त्यामुळे गाडीत बसलेले दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा ट्रक कार्डबोर्डचा अतिरिक्त भार घेऊन जात असल्याने एका बाजूला कलंडला असल्याचे बोलले जात आहे.
  राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसमध्ये दाखल झाले आहे. थोड्या वेळात पीडित कुटुंबियांची भेट घेतील
मुंबई शहर, उपनगरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
पुढच्या काही वेळात राहुल, प्रियांका गांधी ‘हाथरस’ला पोहोचलीत
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचे समोर येत आहे.
राहुल गांधी यांच्यासह पाच जणांना पीडित कुटुंबियांची भेट घेण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.
युमना एक्स्प्रेस वेवर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी माघारी फिरावं, असं पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
राहुल गांधींसह प्रियांका गांधी हाथरसकडे रवाना
कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी देखील हाथरसकडे रवाना झाल्या आहेत.
एसीएस होम अवनीश अवस्थी आणि डीजीपी एचसी अवस्थी हाथरसमधील पीडितेच्या कुटूंबाला भेटले.
राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी हाथरसकडे रवाना झाले आहेत. थोड्या वेळात राहुल गांधी पीडित कुटुंबियांची भेट घेतील.
गेल्या २४ तासांत राज्यात १९० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २३ हजार ८७९वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २५० जणांचा मृत्यू झाला असून २० हजार ८७१ पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या २ हजार ७५८ पोलीसावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.
एसीएस होम अवनीश अवस्थी आणि डीजीप एचसी अवस्थी आज हाथरस येथए भेट देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिमाचल प्रदेशमधील रोहतांग येथे अटल बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे चाचण्यावर अधिक भर दिला जात आहे. २ ऑक्टोबरपर्यंत देशात ७ कोटी ७८ लाख ५० हजार ४०३ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ११ लाख ३२ हजार ६७५ कोरोनाच्या चाचण्या शुक्रवारी झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे.
देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या २४ तासांत देशात ७९ हजार ४७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६४ लाख ७३ हजार ५४५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.
नासाने एस.एस. कल्पना चावला कार्गो अंतराळात सोडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. मोदी आज सकाळी १० वाजता हिमाचल प्रदेशमधील रोहतांग येथे अटल बोगद्याचे उद्घाटन करतील.
सुप्रसिद्ध विदुषी, समाजकार्यकर्त्या, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक पुष्पा भावे यांचं रात्री १२.३० वाजता निधन झालं. आज सकाळी ८ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
First Published on: October 3, 2020 11:54 PM
Exit mobile version