महाड : दुचाकी अपघातात २ शाळकरी मुलांचा मृत्यू

महाड : दुचाकी अपघातात २ शाळकरी मुलांचा मृत्यू

महाड : दुचाकी अपघातात २ शाळकरी मुलांचा मृत्यू

महाड तालुक्यातील बिरवाडी – ढालकाठी येथे दूचाकीचा अपघात झाला. या अपघातात स्कूटीवर प्रवास करणाऱ्या ३ अल्पवयीन मुलांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. हे तिघेही शाळकरी विद्यार्थी असून, याच परिसरातील असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बिरवाडी येथून घरी परतत असताना स्कूटी (एमएच ०६ सीए ८७४६) ही निसरड्या रस्त्यावरून घसरली. महाड-भोर-पुणे मार्गावर ढालकाठी येथे ही दुर्घटना घडली. शुभम झांझे (१६, रा. आकले), विशाल यादव (१५, रा. ढालकाठी) आणि आदित्य घाडगे (१६, रा. आदर्श नगर, बिरवाडी) अशी या तिघांची नावे आहेत. यापैकी शुभम आणि आदित्य हे दोघे जागीच ठार झाले. तर विशाल गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचाराकरिता तातडीने मुंबईत हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दिवसभरच्या उन्हानंतर सायंकाळी पडलेल्या पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून स्कूटी घसरली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे.


हे ही वाचा – Mumbai Cruise Drugs: कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्ज पार्टीशी काहीही संबंध नाही, कॉर्डेलिया कंपनीचे स्पष्टीकरण


 

First Published on: October 3, 2021 6:29 PM
Exit mobile version