Live Update: राहुल गांधी उद्या लखीमपूरला भेट देणार

Live Update: राहुल गांधी उद्या लखीमपूरला भेट देणार

india corona update monsoon update maharashtra coronavirus section 144 omicron 12 december 2021 PM Modi Twitter accout hack sharad pawar birthday

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ५ सदस्यीय शिष्टमंडळ उद्या उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीला भेट देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राकेश झुनझुनवाला यांना भेटले.
मुंबईत गेल्या २४ तासांत ४३३ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ जणांच्या मृत्यची नोंद झाली आहे. तर ५२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख ४५ हजार १६३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार १२९ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख २२ हजार ९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या ४ हजार ४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ४०१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार ८४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील आता कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ६४ हजार ९१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार २७२ जणांचा मृत्यू झाला असून ६३ लाख ८८ हजार ८९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ३३ हजार १५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील चौघांना आज किला कोर्टात हजर करण्यात आले आहे.
शिर्डीतल्या साई मंदिरातील नियमावलीत आता बदल करण्यात आला आहे. १५ हजार भाविकांना ऑनलाईन पासद्वारे दर्शन मिळणार आहे. ऑफलाईन पास न देण्याचा निर्णय समन्वय बैठकीमध्ये झाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती महाराष्ट्र विधिमंडळात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचा ‘अर्थसंकल्प माझ्या मतदारसंघासंदर्भात’ असे कार्यशाळेचे नाव आहे. माझा मतदार संघ म्हणजे माझे राज्य काल शाळेची घंटा वाजली, आज आपला वर्ग भरला.आपण सर्व विद्यार्थी आहोत. रांगोळीतील ठिपके हे माझे मतदार संघ आहे. विकासाचे चित्र दाखवणारा आपला अर्थसंकल्प आहे – मुख्यमंत्री
मुंबईत मलबार हिलजवळ खाडीत ८ मुले बुडाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत राज्यामंत्री बच्चू कडूं यांनी बाजी मारली असून बच्चू कडूंच्या पॅनलने विजय मिळवला आहे. बच्चू कडू यांनी २२ मते तर बबलु देशमुख यांनी १९ मते मिळवली आहेत.
देशात गेल्या २४ तासात १८,३४६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागच्या २०९ दिवसातील ही सर्वांत कमी संख्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा ९७.९३ टक्के इतका आहे. देशात सध्या २,५२,९०२ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.
राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या.शाळांमध्ये पहिल्याच दिवशी २५ लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती लावली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी,शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे.
First Published on: October 5, 2021 10:05 PM
Exit mobile version