Manipur Election 2022: मणिपूर विधानसभा निवडणूकांच्या तारखा बदलल्या, आता ‘या’ दिवशी होणार मतदान

Manipur Election 2022: मणिपूर विधानसभा निवडणूकांच्या तारखा बदलल्या, आता ‘या’ दिवशी होणार मतदान

Goa Assembly Election 2022: गोव्यात 301 उमेदवारांचे भवितव्य 11 लाखांहून अधिक मतदारांच्या हाती, उद्या होणार मतदान

Manipur Assembly Election 2022 Dates Changed :  मणिपूर विधानसभा निवडणूकांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून मणिपूर विधानसभा निवणूकांच्या नव्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नव्या तारखांनुसार, मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान २७ फेब्रुवारी ऐवजी आता २८ फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे ३ मार्च ऐवजी ५ मार्च रोजी होणार आहे. मणिपूरच्या निवडणूकांच्या निकालांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वीच पंजाब विधानसभा निवडणूकांच्या तारखा देखील बदलण्यात आल्यात. पंजाब निवडणूक आता १४ आणि २० फेब्रुवारी रोजी होणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर निवडणूका या पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगासाठी फार आव्हानात्मक आहेत. कारण मणिपूरची भौगोलिक परिस्थिती तिथली सक्रीय बंडखोरी ही मोठी डोकेदुखी असून यामुळे मणिपूरच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मणिपूरमध्ये ६० जागांसाठी मतदान होणार आहे. ६० जागांसाठी मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ १९ मार्च २०२२रोजी संपणार आहे. अनेक आदिवासी समूह आणि राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मणिपूरच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकांच्या तारखा बदलण्यासाठी आवेदन केले होते. २७ फेब्रुवारीला रविवार असल्याने मणिपूरमधील सर्व चर्च सेवा प्रभावित होतील, असे त्यांनी म्हटले होते.

मणिपूर निवडणूकांविषयी बोलायचे झाले तर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोव्यासह मणिपूर विधानसभा निवडणूकांबाबत इंटरेस्ट दाखवला आहे. सिक्कीम आणि त्रिपुराप्रमाणे मणिपूर हे ईशान्य भारतातील एक हिंदू राज्य आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर दौरा करत मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार येईल अशा घोषणा केल्या होत्या.


हेही वाचा –  Elections 2022 : ५ राज्यांतील ‘या’ सर्वाधिक महत्त्वाच्या विधानसभेच्या जागा, कोण बाजी…

First Published on: February 10, 2022 9:20 PM
Exit mobile version