Manipur First Phase Voting : पहिल्या टप्प्यात ३८ पैकी ३० जागा आम्हीच जिंकणार, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

Manipur First Phase Voting : पहिल्या टप्प्यात ३८ पैकी ३० जागा आम्हीच जिंकणार, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

Manipur First Phase Voting : पहिल्या टप्प्यात ३८ पैकी ३० जागा आम्हीच जिंकणार, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

 Manipur First Phase Voting : मणिपूरमध्ये आज विधानसभा निवडणूकांच्या मतदानाचा दिवस आहे. मणिपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मणिपूरमध्ये ३८ जागांसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मणिपूरमध्ये ४८.८८ टक्के मतदान पार पडले आहे. कांगपोकपी जिल्ह्यात सर्वाधिक ३२.६ टक्के मतदान झाले. तर चुरचंदपुर जिल्ह्यात सर्वात कमी १६.६ टक्के मतदान पार पडले. मणिपूरमध्ये ३८ जागांमध्ये १५ महिला उमेदवार निवडणूकीसाठी उभ्या पाहिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एन लोकेश सिंह मैदानात उतरले आहेत. दरम्यान मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात ३८ जागांपैकी ३० जागा आम्हीच जिंकू असा दावा मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी केला आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी आज मतदान करण्यासाठी जाण्याआधी पूजा अर्चा केली. त्यानंतर सकाळीच त्यांनी श्रीवन हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर बाहेर येताच त्यांनी ३८ पैकी ३० जागांवर भाजपच जिंकेल असा दावा केला.

मेरीकॉमचा पतीही मैदानात

बॉक्सर मेरी कॉमचा पती कारोंग ओंखोलेरही स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. ओंखोलर चुराचंदपुर जिल्ह्यातील साईकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. ओंखोलरने देखील आज सकाळी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे ओंखोलरने निवडणूकीच्या प्रचारात कुठेही पत्नी मेरी कॉमची मदत घेतली नाही. तसेच मेरीकॉम सध्या ट्रेनिंगसाठी दिल्ली येथे असल्याने तिने देखील मतदान केलेले नाही.

मतदारसंघात दगडफेक आणि गोळीबार

मणिपूरमध्ये विधानसभा क्षेत्रात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. केराव विधानसभा मतदारसंघात दगडफेक आणि गोळीबाराच्या घटना समोर आल्या. त्याचप्रमाणे केईराओ विधानसभा क्षेत्रात मतदान केंद्रांवर नागरिकांना पैसे वाटण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. नागरिकांना पैसे वाटणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक देखील केली.

न्यू केइथलमानबी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही वेळासाठी मतदान ठप्प करण्यात आले होते. याचवेळी ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटचेही नुकसान झाले. रिटर्निंग ऑफिसरला तात्काळ बोलावून बॅकअप ईव्हीएम आणावे लागले.

 


हेही वाचा – Manipur Election : मणिपूरमध्ये दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, मुख्यमंत्री बीरेन सिंह मैदानात

First Published on: February 28, 2022 3:12 PM
Exit mobile version