गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी बॉयफ्रेंड झाला स्वतःच किडनॅप

गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी बॉयफ्रेंड झाला स्वतःच किडनॅप

गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी बॉयफ्रेंड झाला स्वतःच किडनॅप

एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडचा खर्च उचलण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा कट करून घरच्याकडून अडीच लाख रुपयांची मागणी केली. पोलिसांच्या तपासात या प्रकरणाचा खुलासा झाला. या कटासाठी आरोपी तरुणाने एका मोबाईल अॅपचा वापर केला होता. मात्र गर्लफ्रेंडच्या लाडा पोटी केलेल्या या कटामुळे तरुणाला थेट तुरुंगात जावे लागले. ही घटना मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात घडली आहे.

दरम्यान भिंडच्या गोहद पोलीस ठाण्यात सुरेंद्र सिंह कुशवाह नावाच्या व्यक्तीने ६ नोव्हेंबरला आपला १८ वर्षांचा मुलगा संदीप हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तो घरातून बाहेर पडल्यापासून परतला नसल्याची माहिती तक्रारीत नोंदवली. ८ नोव्हेंबरला पीडित वडिलांना एक फोन आला. ज्यामध्ये म्हटले की, तुमचा मुलाचे अपहरण झाले आहे आणि त्याच्या देखरेखीसाठी अडीच लाख रुपये द्या. हे ऐकता वडील घाबरत पोलीस ठाण्यात पोहोचले आणि फोनवर झालेली बातचित पोलिसांना सांगितली.

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. संदीप ग्वालियरमध्ये असल्याची माहिती मिळाली. मोबाईल लोकेशन ट्रॅक करून पोलिस संदीपपर्यंत पोहोचले. पोलिस तपासात संदीपने स्वतःच्या अपहरणाचा कट रचल्याचा खुलासा झाला. त्याचे अपहरण झाले नव्हते. तो स्वतःच्या मर्जीने घरातून गेला होता. त्याला पैशांची गरज होती. परंतु घरातून पैसे मिळाले नसल्यामुळे त्याने असे पाऊल उचलले. या संपूर्ण प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पोलिस ठाण्याचे प्रभारी गोपाल सिंह सिकरवार म्हणाले की, पोलिसांच्या चौकशीत तरुणाने सांगितले की, गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध सुरू आहेत. तिला भेटायला जाण्यासाठी आणि तिचा खर्च उचलण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने बहाने करून घरच्यांकडे पैसे मागितले. परंतु घरच्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तो घरातून गायब झाला. त्यानंतर दोन दिवसांनी आपल्या मोबाईलमध्ये वॉईस चेंजर अॅप डाऊनलोड केला आणि त्याच्या मदतीने आवाज बदलून वडिलांना फोन केला. वडिलांकडे दीड लाखांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर मारून टाकण्याची धमकी देखील दिली होती.

First Published on: November 10, 2021 8:41 PM
Exit mobile version