Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात, गेल्या २४ तासात २ हजार रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात, गेल्या २४ तासात २ हजार रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या नोंदणीमध्ये घट झाला आहे. मुंबईत एप्रिलमध्ये दिवसाला ८ हजार रुग्णांची नोंद होत होती परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने कडक निर्बंध आणि नंतर लॉकडाऊन केला होता. या लॉकडाऊनमुळे पालिका प्रशासनाला मुंबईतील कोरोना आटोक्यात आणण्यात यश आले आहे. मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ९४६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २ हजार ३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु ६८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुंबईत लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ९४६ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत ६ लाख ८४ हजार ४८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर यातील एकुण ६ लाख २९ हजार ४१० कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या मुंबईत ३८ हजार ६४९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. गेल्या २४ तासात ६८रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४ हजार ७६ वर गेला आहे.

मुंबईत कोरोना आटोक्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांचा बरे होण्याचा दर ९२ टक्क्यांवर गेला आहे. दिवसाला ३०८८६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून फक्त मुंबईत आतापर्यंत ५८ लाख २६ हजार ०७४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात मृत्यू झालेल्यांपैकी ४० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. ४० रुग्ण पुरुष व २८ महिला होते. ७ रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते. ३९ रुग्णांचे वय ६० वर्षांवरील होते. तर उर्वरित २२ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला

राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात कडक निर्बंध १ जूनपर्यंत लागू केले आहेत. १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यादरम्यान कोणत्याही मार्गाने परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आरटीपीसीआरचा ४८ तासांचा निगेटिव्ह अहवाल असणे गरजेचे आहे. कारण महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी आजूबाजूच्या राज्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे इतर राज्यातून संसर्ग येऊ नये म्हणून राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

First Published on: May 13, 2021 9:07 PM
Exit mobile version