मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

महाराष्ट्र पोलीस

मुंबईतील शिवडी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर शंकर वाघमारे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मुंबईत आतापर्यंत पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात सोलापूर, नाशिक आणि पुणे येथे प्रत्येकी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. कोविड विरोधातील योद्ध्यांचे दुःखद निधन होत असल्यामुळे पोलीस धास्तावले आहेत. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबात आता भीतीचे वातावरण आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत १००७ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. यात १०६ बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे सर्वाधिक म्हणजेच ४०० पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी हजारो पोलिसांना क्वारंटाईन देखील करण्यात आलेले आहे. मुंबईत पोलिसाचा पहिला मृत्यू झाल्यानंतर गृहखात्याने ५५ वर्षावरील पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश दिले होते.

कोरोनाचा समूह संसर्ग होऊ नये, म्हणून अहोरात्र रस्त्यावर बंदोबस्तासाठी ड्युटी निभावणाऱ्या पोलिसांनाच आता कोरोनाने वेढले आहे. कोरोनामुळे राज्यभरात आतापर्यंत ८ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

First Published on: May 13, 2020 12:36 AM
Exit mobile version