गागोदेखिंडी ठरतेय वाहन चालकांसाठी धोकादायक

गागोदेखिंडी ठरतेय वाहन चालकांसाठी धोकादायक

गागोदेखिंड ठरते वाहन चालकास धोकादायक

तळीये गावावर दरड कोसळल्याने असंख्य लोक गाडले गेले. यावर्षी राज्यात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे पेण – खोपोली मार्गावर वाहनांची वर्दळ पाहावयास मिळत आहे. या मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने वाहन चालकाला वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पेण खोपोली मार्गालगत गागोदेखिंडी मध्ये अनेक छोट्या मोठ्या दरड कोसळून दगडी रस्त्यावर येत असतात. त्यामुळे वाहन चालकास आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. जास्त पाऊस पडून एखाद्या गाडीवर दरड कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष नाही दिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, हे नाकारता येणार नाही.

पेण खोपोली मार्गावर चौपदरीकरणाचा काम चालू आहे. मात्र काही भाग वगळता बऱ्याच प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. पावसामध्ये खड्ड्यात पाणी जाऊन ते वाळू मिश्रित दगडे खड्ड्याच्या बाहेर येत असल्याने दुचाकी वाहन चालक गाडी घसरून पडण्याची शक्यता आहे. वाहनचालकाकडून वर्तवली जात आहे. या मार्गावरुन अनेक लोडिंग वाहनांची वर्दळ असते. तसेच ग्रामीण भागातून तालुक्यात जाण्यासाठी एसटी ,रिक्षा, विक्रम पिसेजर भरून यांसारख्या गाड्याची गागोदेखिंडीतून वाहनाची रेलचेल सुरू असते. त्यामुळे कोणत्या गाडीवर दरड कोसळून दुर्घटना घडू नये,असे  संबंधित विभागांनी धोकादायक दरड कोसळून काढून टाकावी,अशी वाहन चालकांकडून मागणी जोर धरू लागली आहे.

पेण खोपोली मार्गालगत गागोदेखिंडी मधून ७० ते ८० विक्रम पॅसेंजर भरून ये-जा करत असतात. त्यामुळे गागोदेखिंडीमध्ये धोकादायक दरड व झाडे काढावेत. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून रस्त्यावर दगडे येत असतात त्यामुळे एखाद्या गाडीवर दगडे आणि झाडे पडून मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी पेण पूर्व विभाग विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केली आहे.

-मितेश जाधव


हेही वाचा – Tokyo Olympics : तिरंदाज प्रविण जाधवचे आव्हान संपुष्टात; वर्ल्ड नंबर वन खेळाडूकडून पराभूत

First Published on: July 28, 2021 5:53 PM
Exit mobile version