CoronaVirus: सांगलीत आढळले आणखी १२ करोना पॉझिटिव्ह; राज्यात एकूण १४७ रुग्ण

CoronaVirus: सांगलीत आढळले आणखी १२ करोना पॉझिटिव्ह; राज्यात एकूण १४७ रुग्ण

राज्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा एकूण १४७ वर पोहोचला आहे. एकट्या सांगलीत १२ नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित रुग्णांची संख्या ११ वरुन २३ वर पोहोचली आहे. इस्लामपूर मधील हे कुटुंब असून एकाच कुटुंबातील १२ जणांना करोनाची बाधा झाली आहे. संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं असूनही महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढत आहे.

इस्लामपूरमधली कुटुंबियांच्या तपासणीचा अहवाल थोड्याच वेळापूर्वी मिळाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. शिवाय, या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या कोल्हापूरमधील आणखी एका महिलेला करोनाची बाधा झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १९ जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यात एका तीन वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.

इस्लामपूरमधला तो भाग बंद केला जाणार

सांगलीतील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातल्या १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. ज्या भागात हे १२ जण राहतात तो भाग बंद करण्यात असल्याचं ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. तसंच, या कुटुंबातील एकाच व्यक्तीला बाहेर पडता येईल. त्याच्या हातावर शिक्का मारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरातील एका कुटुंबातील चौघे सौदी अरेबियातील हज यात्रेला गेले होते. १३ मार्च या दिवशी हे परतले. त्यांना १४ दिवसांचं होम क्वॉरंटाईन करण्यात सांगण्यात आले होते. या कुटुंबातील ३५ जणांसोबत त्यांचा संपर्क आला. त्यातीलआधी १८ जणांना शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील चौघांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बुधवारी आणखी ५ जणांचा पॉझिटिव्ह आला. गुरुवारी रात्री दोघांच्या पॉझिटिव्ह अहवालानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

First Published on: March 27, 2020 5:05 PM
Exit mobile version