आठ दिवसांत घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता -अशोक चव्हाण

आठ दिवसांत घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता -अशोक चव्हाण

मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, याकरिता राज्य सरकारने 18 नोव्हेंबरला चौथ्यांदा आपला अर्ज सुप्रीम कोर्टा सादर केला होता. आता या अर्जाबाबत लवकरात लवकर निर्णय होणार असून येत्या आठ दहा दिवसात घटनापिठाची स्थापना होऊन सुनावणी होणार असल्याचे संकेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

अशोक चव्हाण यांनी याबाबत एक ट्विट करून माहिती दिली आहे. ’राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळण्याचे संकेत आहेत. एसईबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जानुसार घटनापिठाची स्थापना होऊन आठ ते दहा दिवसात सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. #मराठाआरक्षण’, असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.

राज्य सरकारने 20 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला अंतरिम आदेश स्थगित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या अर्जावर सुनावणी घेण्यासाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करणारा पहिला अर्ज 7 ऑक्टोबर, दुसरा अर्ज 28 ऑक्टोबर, तिसरा अर्ज 2 नोव्हेंबर तर चौथा अर्ज 18 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आला.

First Published on: December 5, 2020 6:24 AM
Exit mobile version