अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांचा शुक्रवारी संप

अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांचा शुक्रवारी संप

प्रातिनिधीक फोटो

केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शुक्रवारी, 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. यावेळी त्यांनी उद्या दिवसभर सर्व दवाखाने बंद राहणार असल्याचं जाहीर केलं असून डॉक्टरांनीही दवाखाने बंद ठेवण्याचे आवाहन आयएमएने केले आहे. त्यामुळे उद्या रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

आयएमएने एक पत्रक काढून उद्या 11 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्या सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा पहाटे 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी आरोग्य यंत्रणेतील काही गोष्टी सुरळीत असणार आहेत. त्यात अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, कोविड केअर सेंटर, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरू राहणार आहेत.

सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या संस्थेने एक नोटिफिकेशन काढले आहे. या नोटिफिकेशनमध्ये आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यास शस्रक्रियेसाठी परवानगी दिली गेली आहे. नोटिफिकेशनमध्ये 58 प्रकारच्या शस्रक्रियांची परवानगी दिली गेलीय. यामध्ये साध्या शस्रक्रियांशिवाय मेंदूच्या शस्रक्रियेचाही समावेश आहे. यालाच इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केलाय. IMAच्या म्हणण्यानुसार ही ‘मिक्सोपॅथी’ असून यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळेच हा संप पुकारण्यात आला आहे.

First Published on: December 11, 2020 7:10 AM
Exit mobile version