जात सांगा, रेशन घ्या! जातनिहाय सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी

जात सांगा, रेशन घ्या! जातनिहाय सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी

जात सांगा, रेशन घ्या! जातनिहाय सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी

अन्न सुरक्षा कायदा 2013 अन्वये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची केंद्र शासनाच्या वतीने रेशन घेण्यासाठी फक्त एस.सी, एस.टी सर्वेक्षण करण्याचा आदेश काढला असून त्यानुसार शिधावाटप कार्यालयामार्फत व शिधावाटप दुकानांमध्ये जात सांगा व रेशन घ्या असा प्रकार आढळून आल्याने समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.  याबाबत रेशनिंग कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे यांनी शिधावाटप अधिकारी कल्याण यांना निवेदन देऊन जात निहाय सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे.

रेशन दुकानांमध्ये धान्य घेण्यासाठी गेलेल्यांना जात विचारली जात असून अनुसूचित जाती जमाती मधील लाभार्थ्यांना या शासकीय आदेशाने त्यांच्यावर होणारा अन्याय असल्याचे राम बनसोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

बहुतांशी एस.सी, एस.टी व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील समाज अन्नधान्याला मुकलेला असून तो आजही वंचित असताना तूंटपुंज्या समाजामधील लोकांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. यामुळे समाजात जातनिहाय रोष व तेढ निर्माण होणार नाही व संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली होणार नाही याची शासनाने खबरदारी घ्यावी अशा स्वरूपाचे निवेदन कल्याणचे शिधावाटप अधिकारी यांना निवेदनात रेशनिंग कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे यांनी केली आहे.


हेही वाचा – दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हाडाची ८ हजार २०५ घरांची लॉटरी!

 

First Published on: August 6, 2021 12:45 AM
Exit mobile version