CoronaVirus: करोनामुळं देशात सातवा मृत्यू, रुग्णांची संख्या ३४५

CoronaVirus: करोनामुळं देशात सातवा मृत्यू, रुग्णांची संख्या ३४५

प्रातिनिधिक छायाचित्र

करोना व्हायरसला अटकाव घालण्यासाठी देशात आणि राज्यात युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. देशात करोनाचे रुग्ण वाढत असताना आता मृतांचा आकडा देखील वाढत आहे. भारतातील रुग्णांची संख्या ३४५ (संध्याकाळी ७ वाजेपर्यंत) झाली असून आता सातव्या रुग्णाचा देखील बळी गेला आहे. गुजरातमध्ये करोनामुळे पहिला रुग्ण दगावल्याची माहिती समोर येत आहे. सुरत येथील ६७ वर्षीय रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी देशभरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचा मार्ग अवलंबला होता. तरिही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. महाराष्ट्रात सर्वाधिक ७४ रुग्ण आहेत.

गुजरातमध्ये करोनामुळे मृत्यू झालेला रुग्ण दिल्ली आणि जयपूर येथे प्रवास करुन आला होता. १७ मार्च रोजी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्च २१ रोजी तो करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. सुरतचे जिल्हाधिकारी धवलकुमार पटेल यांनी सांगितले की, मृत व्यक्ती करोना बाधित असून त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अस्थमा आणि किडनीशी संबंधित आजार असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज रविवारी दुपारी अडीच वाजता या व्यक्तीचा मृत्यू झाला.

 

 

First Published on: March 22, 2020 6:56 PM
Exit mobile version