Goa Assembly Election 2022 : गोव्यातही २०० ठिकाणी शिवभोजन थाळीचा पॅटर्न, शिवसेनेचा डिजिटल जाहीरनामा घोषित

Goa Assembly Election 2022 : गोव्यातही २०० ठिकाणी शिवभोजन थाळीचा पॅटर्न, शिवसेनेचा डिजिटल जाहीरनामा घोषित

शिवसेनेने गोवा विधानसभा २०२२ साठीचा जाहीरनामा शिवसेनेकडून आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित झाला. महिला, युवा वर्ग, शिक्षण, ग्रामविकास, उद्योग व रोजगार, शहर विकास, अन्न सुविधा यासारख्या क्षेत्रासाठीचा जाहीरनामा शिवसेनेने गोवेकरांसाठी जाहीर केला. शिवसेना गोवा विधानसभा निवडणूकीत जोरदार प्रचार करत आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये होती, त्यामुळे अनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढवली नाही. पण युतीत असताना भाजपने पाठीत खंजीर खुपसला, म्हणूनच एनडीएतून बाहेर पडल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. गोव्यातही २०० ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवणाची केंद्रे स्थापन करण्याचे शिवसेनेच्या जाहीरनाम्यात नमुद करण्यात आले आहे. शिवसेनेने गोव्यातही २०० ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवणाची सुविधा उपलब्ध करून देत शिवभोजन थाळीचा पॅटर्न राबवण्याची घोषणा केली आहे.

 

शिवसेनेचा जाहीरनामा काय ?

– आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार
– युवा सक्षमीकरणासाठी ओपन जीम, फुटबॉल आणि इतर खेळांसाठी आंतरराष्ट्रीय स्तराची अकादमी तयार करणार
– विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणार
– एनडीआरआफच्या धर्तीवर आपतकालीन सेवेकरिता त्वरीत सुरक्षा मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचा प्रशिक्षित गट तयार करणार
– स्थानिकांना ८० टक्के आरक्षित नोकऱ्यांसाठी कायद्याची सक्त अंमलबजावणी आणि भूमिपूत्रांना न्याय देणार
– राज्यातील शहरांमध्ये अंतर्गत बससेवा आणि इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार
– निराधार योजनेअंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार
– राज्यात २०० ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार


 

First Published on: February 12, 2022 5:37 PM
Exit mobile version