मुरूडमध्ये गणेशमूर्तींवर कलाकारांचा शेवटचा हात

मुरूडमध्ये गणेशमूर्तींवर कलाकारांचा शेवटचा हात

मुरूडमध्ये गणेशमूर्तींचे रंगकाम शेवटच्या टप्प्यात

गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणेशाच्या मूर्ती बनविणार्‍या कारखान्यांमध्ये मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, विविध रंगांनी रंगविलेल्या गणेशमूर्ती सध्या कारखान्यांमध्ये तयार होताना पहावयास मिळत आहेत. तयार झालेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी इतरत्र पाठविण्याची कामही वेगाने सुरू आहेत.येत्या १० सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक सण म्हणून याकडे पाहिले जाते. अर्ध्या फुटापासून ते १० फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती गणेशोत्सवामध्ये पहावयास मिळतात. ग्रामीण भागातही अनेक कारागरीवर बनवत असल्याचे दिसून येते. गणेशमूर्ती तयार झाल्या असून मूर्तीवर रंगकाम करण्याचे अंतिम काम वेगात सुरू आहे. गणेशोत्सवात आकर्षक गणेशमूर्तीला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे अनेक कारागिरांचा आकर्षक मूर्ती बनविण्याकडे कल असतो. सध्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती तयार असून, रंगकामही अंतिम टप्प्यात आल्याचे पहावयास मिळत आहे.

तालुक्यात मागील आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गणपती कारखानदारांना मोठी मुभा मिळाली असून, रंग त्वरित सुकण्यास मदत होत आहे. तालुक्यात सुमारे १५० गणपती कारखानदार असून, सर्वच कारखानदार गणपतीचे काम अंतिम टप्याकडे नेण्याचे काम सुरु आहे. पाऊस थांबल्यामुळे वीज जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे यंदा सर्वांचे गणपती वेळेत मिळणार आहेत. शहरासह तालुक्यात सार्वजनिक गणपतीची प्रथा नसून प्रत्येक घरात स्वतंत्र गणपती आणण्याची परंपरा आहे. रेवदंडा आणि मुरुड पोलीस ठाणे हद्दीत सुमारे १० हजारांच्यावर गणपती प्रत्येकाच्या घरात आणले जातात.

मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर या परिसरात राहणारी सर्व मंडळी गणपतीच्या आगमनापूर्वी दोन दिवस येण्याची परंपरा आहे. मुंबईतूनच गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करून चाकरमानी आपल्या गावाकडे येत असतो. मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव कोकणात साजरा केला जातो. यानिमित्ताने दोन ते तीन पिढ्या एकत्र येतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येथे तयार केल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन केले जाते. यंदा गणेशमूर्तींच्या किमतीती पाच टक्के वाढ झाली आहे. तरी सुद्धा दरवर्षीप्रमाणे उत्साह तोच दिसून येत आहे.


हे ही वाचा – आर्मस्ट्राँगच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा केला व्हाईट, किरीट सोमय्यांचा नवा आरोप


 

First Published on: September 1, 2021 1:49 PM
Exit mobile version