शाळा सुरू करण्याचा निर्णय एकत्रित घ्यावा; विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सूचना

शाळा सुरू करण्याचा निर्णय एकत्रित घ्यावा; विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सूचना

Kirit Somaiya Car Attack : पोलीस संरक्षणात गुंडगिरी सुरु, जशास तसं उत्तर देणार; सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

शाळा सुरू करायची आहे, असे सरकारला वाटत असेल तर सरकारने एकमताने निर्णय घ्यावा. शिक्षण मंत्री एक घोषणा करतात आणि सरकार एक घोषणा करते. त्यातच टास्क फोर्सला तिसरेच काही वाटत आहे. यामुळे पालकांमध्ये संभ्रम वाटत आहे. पालकांच्या अडचणी वाढविण्यापेक्षा एकत्रित निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केले. यावेळी कोपर पुलाचे उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून त्या पुलाचे लोकार्पण करावे असेही ते म्हणाले.
विरोधीपक्ष नेते फडणवीस हे बुधवारी ठाण्यात एका कार्यक्रमात आले होते. तदपूर्वी त्यांनी ठाण्यातील कोपरी पुलाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना, त्यांनी शिक्षण मंत्री, सरकार आणि टास्क फोर्स या तिघांमध्ये समन्वय नसल्याचे सांगताना, त्या तिघांच्या वेगळवेगल्या निर्णयाने मिक्स सिग्नल जात असल्याचे ते म्हटले आहे. तसेच यासंदर्भात सरकारला जर शाळा सुरू करण्यासंदर्भात वाटत असले तर त्यांनी एकत्रित निर्णय घेऊन मोकळे व्हावे असेही म्हटले. त्याचबरोबर कोपरी पुलाबाबत बोलताना कोपरी पुलाचे काम आमचे सरकार आल्यानंतर सुरू झाले. ठाणेकरांची मागणी लक्षात घेऊन हे काम आता पूर्ण होत आहे. याबाबत ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या दूर झालेल्या आहेत, तरीसुद्धा यातील आणखीन काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील आणि हा पूल ठाणेकरांसाठी भविष्यात निश्चितच लाभदायक ठरेल असेही त्यांनी सांगितले. लवकरच या पुलाचे उर्वरित कामे पूर्ण होतील आणि तो वाहतुकीसाठी खुला होईल असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, ठामपा गटनेते मनोहर डुंबरे आदी उपस्थित होते.
दरम्यान ठाण्यातील मो.ह.विद्यालय येथे संस्कार संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संस्कार क्लाउडचा लोकार्पण सोहळा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोनामुळे नवनवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात केले आहे. यातून ऑनलाईनची संकल्पना देखील पुढे आली आहे, ज्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण सध्या उपलब्ध होत आहे. भविष्यात कोरोना कमी झाल्यानंतरही अशा तंत्रज्ञानाची सवय ही ठेवावी लागणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले जाणे गरेजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी, जिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना आजही ऑनलाईन शिक्षण मिळत नसल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. त्यामुळे अशा विद्यार्थ्यासह इतर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शिक्षण पध्दती फायदेशीर ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. १ ली ते १२ वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण यातून उपलब्ध होणार आहे. त्यानुसार यावेळी ६० विद्यार्थ्यांना अॅनरॉईड फोनचे वाटपही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले., त्यामुळे या उपक्रमाअंतर्गत अशा विद्यार्थ्यासह इतर विद्यार्थ्यांनाही या शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


हे ही वाचा – ठाण्यात बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव येत्या महासभेत; हिरवा कंदील मिळण्याची शक्यता

First Published on: August 12, 2021 10:25 PM
Exit mobile version