Breaking News: हॉटेल, बार ५ ऑक्टोबरपासून सुरु; सरकारची नवी नियमावली जाहीर

Breaking News: हॉटेल, बार ५ ऑक्टोबरपासून सुरु; सरकारची नवी नियमावली जाहीर

मिशन बिगिन अगेन उपक्रमातंर्गत राज्य सरकारने पुन्हा नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत अटी आणि शर्तीसहीत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावेळी हॉटेल, बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर राज्यातंर्गत रेल्वे सेवा सुरु करण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्याची आर्थिक गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारकडून मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील हॉटेल आणि बार यांना परवानगी देण्यात आली आहे. तर मुंबई महानगर क्षेत्रातील अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व उद्योग सुरु करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुंबई उपनगर मार्गावर चालणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तर डब्बेवाल्यांची मागणी मान्य करत त्यांची सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

या बाबी सुरु होणार

– हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार ५ ऑक्टोबर पासून सुरु होणार

– हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी नसेल.

– हॉटेल आणि बारसाठी पर्यटन खात्याकडून वेगळी नियमावली जाहीर केली जाईल.

– मुंबई आणि MMR रिजन मधील सर्व अत्यावश्यक नसलेल्या औद्योगिक संस्थाना सुरु करण्याची परवागनी देण्यात आली आहे.

– ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना पुर्ण वेळ परवानगी असेल.

– राज्यातंर्गत रेल्वे सेवेला परवानगी देण्यात आली आहे.

– मुंबई मधील रेल्वे सेवेतील ट्रेनची संख्या वाढविण्यात आली आहे.

– डब्बेवाल्यांना मुंबई उपनगरीय रेल्वेत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयातून त्यांना क्यूआर कोड उपलब्ध करुन दिले जातील.

– पुणे जिल्ह्यातील लोकल ट्रेन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यावर बंदी कायम

– राज्यात ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था बंदच राहणार असून ऑनलाईन आणि दुरस्थ शिक्षणाला परवानगी देण्यात आलेली आहे.

– सिनेमागृह, स्विमिंग पुल, नाटकाचे थेटर, मनोरंजन पार्क, सभागृह बंदच राहणार

– आंतरराष्ट्रीय प्रवासास बंदी राहणार

– मेट्रो रेल्वे

– सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदीच राहणार

First Published on: September 30, 2020 8:34 PM
Exit mobile version