विधान परिषदेच्या जागांवरुन मतभेद नाहीत-जयंत पाटील

विधान परिषदेच्या जागांवरुन मतभेद नाहीत-जयंत पाटील

जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीमध्ये उशीर झाला नसल्याचे सांगितले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत गुरुवारी चर्चा होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या जागांवरून कोणतेही मतभेद नाहीत.

कोरोनामुळे निर्णय घेण्यात आला नाही, असेही ते म्हणाले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या होणे बाकी आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार होती. मात्र, ही बैठक झालीच नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाद सर्वश्रृत आहे. आज होणार्‍या कॅबिनेटमध्ये याबाबत प्रस्ताव मांडून १२ सदस्यांची ती यादी राजभवनावर पाठवण्यात येणार असल्याचे समजते.

 त्याचा परिणाम या नियुक्त्यांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडी सरकारकडून त्याबाबत सावध पावले उचलण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. जयंत पाटील यांनी याविषयी बोलताना प्रत्येक राजकीय पक्षाला अपेक्षा बाळगणे गरजेचे असते, असे म्हटले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशामध्ये काही वावगे वाटत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. प्रत्येकाला ज्यांचा त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: October 29, 2020 6:36 AM
Exit mobile version