व्याजदरात कोणताही बदल नाही कर्ज घेण्यासाठी हीच योग्य वेळ

व्याजदरात कोणताही बदल नाही कर्ज घेण्यासाठी हीच योग्य वेळ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी आपले पतधोरण जाहीर केले. त्यानुसार, व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३. ३५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सध्या देशातील आर्थिक आकडेवारीतून चांगले संकेत मिळत आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीचे देखील संकेत मिळत आहेत, असे शक्तीकांत दास म्हणाले. व्याजदरात कपात करण्यात आली नसल्याने फिक्स डिपॉझिटधारकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच कर्ज घेण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले जाते.

येत्या डिसेंबरपासून भारतात आरटीजीएस सुविधा २४ तास सुरू केली जाणार आहे. बँकांच्या सर्व कामकाजाच्या दिवशी (दुसरा व चौथा शनिवार वगळता) आरटीजीएस सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु असणार आहे.

चालू आर्थिक वर्षात जीडीपी ९.५ टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (सीएसओ) जाहीर केलेल्या अंदाजानुसार पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये २३.९ टक्के घट झाली आहे. २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपीमध्ये सकारात्मक वाढ होऊ शकते. अर्थव्यवस्था सुधारण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच ग्रामीण अर्थव्यवस्था सर्वात मजबूत आहे.

पुढील आठवड्यात खुल्या बाजारपेठेत २०,००० कोटी रुपये जाहीर केले जातील. आरबीआय आर्थिक वृद्धीला समर्थन देण्यासाठी उदार भूमिका कायम ठेवेल. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारतीय अर्थव्यवस्था निर्णायक टप्प्यात येत आहे, असेही शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.

First Published on: October 10, 2020 6:17 AM
Exit mobile version