पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन तीन जवान, तीन भारतीयांचा मृत्यू

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन तीन जवान, तीन भारतीयांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून या चकमकीत तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत. याशिवाय तीन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान हा गोळीबार करण्यात आला होता, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून पाकिस्तानच्या सात ते आठ जवानांना यमसदनी धाडण्यात आले. हे वृत्त एएनआयने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. भारतीय लष्कराने गोळीबार पाकिस्तानी लष्कराचे बंकर्स, लाँच पॅड्स उद्ध्वस्त केले.

पाकिस्तानकडून केरन, उरी, नौगाम सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यावेळी नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. यामध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले असून, तीन नागरिकांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाले आहेत. भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देत पाकच्या सात ते आठ सैनिकांना ठार केले. याशिवाय पाक लष्कराचे बंकर्स, लाँच पॅड्स उद्ध्वस्त करत मोठे नुकसान केले आहे.

अनेक दहशतवादी तळांनाही यावेळी भारतीय लष्कराने लक्ष्य करत प्रचंड नुकसान केले. या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक राकेश डोवल शहीद झाले. दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान ते शहीद झाले. याशिवाय एक जवान कॉन्स्टेबल वासू राजा जखमी आहेत.

First Published on: November 14, 2020 6:53 AM
Exit mobile version