झेनिथ धबधब्यात वाहून गेलेल्या दोन महिलांसह एका लहानगीचा मृत्यू

झेनिथ धबधब्यात वाहून गेलेल्या दोन महिलांसह एका लहानगीचा मृत्यू

झेनिथ धबधब्यात वाहून गेलेल्या दोन महिलांसह एका लहानगीचा मृत्यू

खोपोलीच्या पर्यटनासाठी आलेल्या १५ पर्यटकांपैकी तीन पर्यटक झेनिथ धबधब्यावरून वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून गेलेल्यांमध्ये मेहेरबानू खान (४०) व रुबीना वेळेकर (४०) रा.विहारी, खोपोली आणि अलमा खान(८) यांचा समावेश असून ते सर्व खोपोलीच्या विहारी गावातील असल्याचे सांगण्यात आले. पैकी मेहेरबानू खान आणि रुबिना वेळेकर यांचे मृतदेह सुमारे एक किलोमीटर अंतरावरून ताब्यात घेण्यात आले. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

कोकण किनार पट्टीवर अतिवृष्टी आणि चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. याच इशाराचा भाग म्हणून रायगड जिल्ह्यात दिवसभर पावसाची संततधार होती. यामुळे परिसरातील नद्यांना पूर आला होता. झेनिथ धबधबाही दुथडीभरून वाहत होता. घाटमाथ्यावर खंडाळा ,लोणावळा येथे सुरू असलेली पावसाची संततधार यामुळे धबधब्याला अचानक पाणी वाढले. त्याचा अंदाज या पर्यटकांना आला नाही. दुपारी सुमारास १५ पर्यटक झेनिथ धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी गेले होते. दोन पुरुष, पाच महिला आणि आठ लहान मुला-मुलींचा यात समावेश होता. आलमा ही वाहून जाऊ लागली असता तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मेहर बानू व रुबिना या दोघीही वाहून गेल्या. दुर्दैवाने त्यात त्यांचा मृत्यू झाला.

धबधब्यावर पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुनाथ साटेलकर, हनीफ कर्जीकर यांच्या नेतृत्वाखाली २० जणांनी १२ पर्यटकांना दोरखंडाच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर तीन तास आलमाचा शोध सुरू होता. परंतु पावसाची संततधार, नदीला वाढलेले पाणी व अंधार यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. बुधवार पहाटेपासून शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती गुरुनाथ साटेलकर यांनी दिली.

धबधबा संकटग्रस्त

झेनिथ धबधबा हा संकटग्रस्त म्हणून ओळखला जात असल्याने तिथे जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे तिथे जाण्यास मज्जाव केला जातो. धबधबा अपघातग्रस्त असल्याचे फलक लावूनही पर्यटक तिथे जातात.

 


हे ही वाचा – अनिल परब यांची ७ तास चौकशी, म्हणाले यापुढेही ‘ईडी’ला सहकार्य करणार


 

 

First Published on: September 28, 2021 10:05 PM
Exit mobile version