भंगारच्या वादातून अपहरण करून अडीच लाख उकळले

भंगारच्या वादातून अपहरण करून अडीच लाख उकळले

भंगार मालाचे वजन कमी भरल्याच्या वादातून फजिल अहमद खान आणि त्याच्या साथीदाराचे अपहरण केले आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने २ लाख ५० हजार रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी अब्दुल कैयुम आणि अफजल ऊर्फ बबलू यांना रसायनी पोलिसांनी अटक केली आहे.

२५ नोव्हेंबर रोजी फजिल भाड्याने आणलेल्या आयशर टेम्पो (एमएच ०४ एफयू १३२८) मध्ये स्क्रॅप भंगार भरून माऊली वजन काटा येथे गेला होता. वजन काट्यावर स्क्रॅप भंगाराचे वजन कमी झाले. त्याचा राग मनात धरून यातील अब्दुल आणि अफजल यांनी फजिल याच्या कानशिलात लगावल्या. त्यानंतर फजिल आणि साथीदाराला गाडीत घेऊन कैरा येथील एल्डर कंपनीमध्ये आणून वायरने बांधून लोखंडी पाइपने मारहाण करण्यात आली.

त्यांच्याकडील २ लाख रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले. तसेच आधारकार्ड आणि पॅनकार्ड क्रमांक घेतले. दोघांना कागदावर लिहिलेला मजकूर त्यांना जबरदस्तीने बोलण्यास भाग पाडत फजिलच्या ठाणे येथील मित्राकडून ५० हजार रुपये जबरदस्तीने घेतले. सुटका होताच फजिल आणि साथीदाराने रसायनी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे करीत आहेत.


हेही वाचा – ‘बाप’ माणूस! वर्षभरात मिळवला २३ मुलांच्या बापाचा मान!


 

First Published on: November 29, 2020 9:31 PM
Exit mobile version