मांजरीला झाली कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसचा संसर्ग हा फक्त मानवाच्या माध्यमातून मानवाला होतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. मात्र बेल्जियममध्ये एका पाळीव मांजरीला कोरोनाची लागण झाली असून तिचा रिपोर्टही पॉझीटीव्ह आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून वैद्यकिय विश्वासमोर नवीन आव्हान उभे ठाकले आहे.

आठवड्याभरापूर्वीच बेल्जियममध्ये राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिचे मांजरही आजारी पडले. यामुळे डॉक्टरांनी त्याचीही तपासणी केली त्यावेळी त्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याआधी हाँगकाँगमध्येही एका कुत्र्याला कोरोना झाल्याचे समोर आले होते. मालकाला कोरोनाची लागण झाल्याने कुत्र्यालाही लागण झाली असे त्याच्या प्राथमिक चाचणीत नमूद करण्यात आले. पण घरी आणल्यानंतर दोन दिवसात त्याचा मृत्यू झाला. यामुळे प्राण्यांनाही कोरोना होतो असा दावा प्राणीतज्ज्ञांनी केला. पण कुत्र्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही प्राण्यांना कोरोना होतो अशी शक्यता कमी असल्याचे सांगितले. पण बेल्जियममधल्या या मांजरीच्या रिपोर्टने पुन्हा एकदा जगभरातील संशोधकांपुढे आव्हान उभे केले आहे.

First Published on: March 30, 2020 4:55 PM
Exit mobile version