‘चुकांची पुनरावृत्ती नको,’ केंद्रीय आरोग्य पथकाच्या ठाणे पालिकेला सुचना

‘चुकांची पुनरावृत्ती नको,’ केंद्रीय आरोग्य पथकाच्या ठाणे पालिकेला सुचना

संतापजनक! पैशासाठी २१६ जिवंत लोकांची नावं कोरोना मृतांच्या यादीत

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी ठाणे जिह्यात कमी अधिक प्रमाणात नवे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्रीय आरोग्य पथक ठाणे शहरात दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने ठाणे शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत ठाणे पालिका प्रशासनाला काही उपाययोजन सुचवल्या आहे. या पथकाने शहरातील अनेक आरोग्य संस्था, रुग्णालयांना भेट देत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेल्या चुकींची पुनरावृत्ती न होता, योग्य ते नियोजन करण्याच्या सुचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य पथकाच्या बरोबरीने महाराष्ट्र राज्याचे कोव्हिड-१९ नोडल अधिकारी व गृहनिर्माण शहर कामकाज मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ. अजित शेवाळे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह ठाणे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. तर कै, नरेंद्र बल्लाळ सभागृहातील पालिकेच्या कोरोनासंबंधीत उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह पालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्हा सध्या कोरोनाच्या तिसऱ्या स्थरात मोडतो. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनासंबंधीत अधिक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. असे असतानाही जिल्ह्यात दिवसेंदिवस नवे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे केंद्रीय पथकाने ठाणे जिल्ह्याला भेट देत शहरात कोरोनासंबंधीत कोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत? कशा पद्धतीने काम सुरु आहे? याचा आढावा घेतला. गुरुवारी सकाळी हे पथक ठाण्यात दाखल होत त्यांनी सकाळपासून बैठका, पाहणी करून शहराची परिस्थिती लक्षात घेतली. कोरोना साथीच्या रोगावर नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न होत असताना नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. असे केंद्रीय पथकाने नमूद केले.

या पथकाने ठाण्यातील पार्किंग प्लाझा, ऑक्सिजन प्लांट, लसीकरण केंद्र तसेच वॉर रुमची पाहणी करत वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. याबरोबर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने समन्वयाने काम करण्याचे निर्देश पथकाने पालिकेला देत उपाययोजनांचे कौतुक केले.


Surekha Sikri Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं ह्रदयविकारच्या झटक्याने निधन

First Published on: July 16, 2021 2:14 PM
Exit mobile version